मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......
पर्यावरणास हानी पोंहचवणारा सरस्वती नदीवरील सिमेंटीकरणाचा प्रस्ताव रद्द करा-सौ.वर्षा जोशी
परळी (प्रतिनिधी)
परळी शहरातुन वाहत असलेल्या सरस्वती नदीचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या धार्मिक इतिहासात मोठे महत्व असुन या नदीच्या अस्तित्वामुळेच परळीला पाण्यावरची परळी अशी ओळख आहे.परळी नगरपालिकेने या नदीचे क्रॉंक्रिटीकरण करुन अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे.यामुळे धार्मिक ठेवा तर नष्ट होणारच आहे परंतु पर्यावरणाची मोठी हाणी होणार असल्याने हा प्रकल्प रद्द करुन पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावा अशी मागणी भाजपा शहर उपाध्यक्षा सौ.वर्षा जोशी यांनी केली आहे.
याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देत सरस्वती नदीवरील प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.परळी वैजनाथ शहरातुन वाहत असलेल्या सरस्वती नदीमुळे शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यास मोठी मदत होते.या नदीच्या पाण्यामुळे पाणीपातळीसह,तापमानात समतोल राखला जातो.या नदीच्या पाण्यामुळे अंबेवेस, गणेशपार,बरकत नगर,कृष्णा नगर,शिवनगर,इंदिरा नगर,पद्मावती गल्ली,आझाद नगर अशा अर्ध्या परळी शहराची पाणीपातळी अवलंबुन आहे.परळी नगरपालिका सध्या सरस्वती नदीवर शासनाचा प्रोजेक्ट राबवण्याच्या तयारीत असुन यामध्ये दोन्ही बाजुंनी भिंती व तळाला क्रॉंक्रीट केले जाणार असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला छेद बसण्याबरोबरच पवित्र सरस्वती नदीचे नैसर्गिक अस्तित्व नष्ट होणार आहे.आपण महाराष्ट्रात इतर ठिकाणच्या नद्यांचे सुशोभिकरण करुन पर्यावरणाचा समतोल राखला जात असताना सरस्वती नदीचे मात्र सिमेंटीकरण करण्यात येत आहे.पवित्र सरस्वती नदीवर पर्यावरणपुरक असा सुशोभिकरणाचा प्रोजेक्ट राबवावा ही विनंती.सरस्वती नदीपात्रातील अतिक्रमण हटवुन नदीचे पात्र मोकळे करत काही ठिकाणी घाट,वॉकिंग ट्रॅक,झाडे-हिरवळ लावुन सुशोभिकरण झाले तर ही परळी शहरातील नागरीक आणि बाहेरगावहुन येणार्या वैद्यनाथ भक्तांसाठी मोठी उपलब्धी असेल.तरी आपण या जनभावनेचा विचार करुन सध्याचा सिमेंट कॉंक्रीटीकरणाचा प्रस्ताव रद्द करुन पर्यावरणपूरक प्रस्ताव राबवावा अन्यथा आम्ही सर्व वैद्यनाथभक्त आंदोलन करणार असल्याचा इशारा सौ.वर्षा जोशी यांनी दिला आहे.या निवेदनाच्या प्रति पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना.पंकजा मुंडे,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी बीड,उपविभागिय अधिकारी परळी वैजनाथ यांना देण्यात आल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा