विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?

इमेज
  स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी परळीतूनही उमेदवारी? माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख इच्छुक; कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची जोरदार मागणी परळी | प्रतिनिधी    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय सदस्य असलेल्या दीपक देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही विकत घेतल्याची माहिती समोर आली असून पक्षाकडे उमेदवारीची मागणी देखील करण्यात आली आहे.    धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठा जनसंपर्क, विविध पदाधिकाऱ्यांशी असलेले निकटचे संबंध आणि कार्यकर्त्यांमधील मजबूत पकड यामुळे दीपक देशमुख यांचे नाव चर्चेत आले आहे. परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कारकीर्दीत त्यांनी विविध विकासकामांवर भर दिला होता. त्यामुळे बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींमध्ये त्यांचा चांगला संपर्क  असल्याचे मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून राजक...

 बीड जिल्ह्यातील पाच अट्टल गुंडांवर 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी

बीड: बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी व वाळू माफियांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकाच दिवशी पाच सराईत गुंडांवर 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची धडक कारवाई करण्यात आली. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २२ मे २०२६ रोजी आदेश पारित करून या पाचही जणांना छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.  


या कारवाईत केज येथील जुबरे ऊर्फ मारी फारोकी (१० गुन्हे), पेठ बीडचा मोमीन सलीम (६ गुन्हे) आणि नवगण राजुरी येथील तुकाराम लक्ष्मण पवार (८ गुन्हे) यांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले व कारागृहात रवाना केले. यातील एक आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दुसऱ्या फरार आरोपीच्या पोलीस मागावर आहे.  


या गुन्हेगारांवर मारहाण, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे आणि अवैध दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून परिसरात त्यांची मोठी दहशत होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ही कामगिरी बजावली. भविष्यातही वाळू तस्कर, गुटखा माफिया आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर 'एमपीडीए' व 'मकोका' अंतर्गत अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट