पोस्ट्स

जुलै १२, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Viral call recording:" इतके दिवस विद्यार्थी झोपले होते का?.... शिक्षणाधिकाऱ्यांचे संताप आणणारे उत्तर

इमेज
  वैद्यनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आंदोलन: "उपोषण कशाचे... सगळी नाटकं चालू आहेत!" ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या कथित वक्तव्याने संतापाची लाट परळी वैजनाथ | प्रतिनिधी शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे शिक्षणाचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करत सलग तीन दिवस आंदोलन करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाच "नाटक" संबोधल्याचा आरोप बीडच्या शिक्षणाधिकारी यांच्यावर होत असून, त्यांच्या कथित वक्तव्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर पवित्र शिक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्या संवेदनशीलतेवर सवाल उपस्थित केला जात आहे.याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून  शिक्षणप्रेमी, पालक व नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.       परळीतील वैद्यनाथ विद्यालयात १६ पैकी केवळ ६ शिक्षक शाळेत उपस्थित राहतात तर अन्य दहा शिक्षक शाळेला येत नसल्याच्या तक्रारीवरून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. शिक्षणाच्या हक्कासाठी लहान मुले रस्त्यावर उतरली, शाळेतील प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांकडून कथितरित्या "इतके द...

सर्व स्तरांतून अभिनंदन!!!!

इमेज
  फार्म डी तृतीय वर्ष परीक्षेत कु. श्रुती क्षिरसागरचे उज्ज्वल यश परळी वैजनाथ | प्रतिनिधी      परळी वैजनाथ येथील किसान ट्रॅक्टरचे संचालक तथा दै. मराठवाडा साथीचे विशेष प्रतिनिधी संजय क्षिरसागर यांची कन्या कु. श्रुती संजय क्षिरसागर हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत लोणी येथील प्रवरा रुरल कॉलेज ऑफ फार्मसी मार्फत घेण्यात आलेल्या फार्म डी (डॉक्टर ऑफ फार्मसी) तृतीय वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. श्रुती हिने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळवले असून तिच्या या यशामुळे क्षिरसागर परिवारासह परळी शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्ग, क्षिरसागर परिवारातील सदस्य, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यातील उच्च शिक्षण आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

परळीत वंदे मातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अशोकजी जोशी यांची १४ वी पुण्यतिथी

इमेज
स्व.अशोकजी जोशी यांचे राष्ट्रनिष्ठ विचार सदैव प्रेरणादायी- दिलीप जोशी परळी,(प्रतिनिधी):-      राष्ट्रनिष्ठ, संघर्षशील आणि ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या वंदे मातरम सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अशोकजी  जोशी यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शासकीय विश्रामगृहात  अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.      कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अशोकजी  जोशी यांच्या प्रतिमेस वंदे मातरम सेनेचे अध्यक्ष दिलीप जोशी, उपाध्यक्ष बालासाहेब गित्ते, मनोजराव जबदे, मराठवाडा युवक अध्यक्ष शेख इरफान, शिवसेना नेते संजय कुकडे, मुन्ना अरणकल्ले, विकासराव मुंडे, शंकरराव इंदुलकर, भानुदास उफाडे, भैय्या इंदुरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले. यावेळी बोलताना वंदे मातरम सेनेचे अध्यक्ष दिलीप  जोशी म्हणाले की, अशोकजी जोशी हे केवळ एका संघटनेचे संस्थापक नव्हते, तर राष्ट्रभक्तीची विचारधारा युवकांच्या मनामनात रुजवणारे प्रेरणास्रोत होते. त्यांनी  तरुणांमध्ये देशभक्तीची चेतना जागवली. मुंबईतील...

बनावट सदस्य नोंदवही, बनावट ठराव, बनावट शपथपत्रे तयार केल्याचा आरोप....

इमेज
शैक्षणिक संस्थेवर ताबा मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल बीड | प्रतिनिधी            परळी-वैजनाथ येथील एका नोंदणीकृत शैक्षणिक संस्थेच्या कारभारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला असून, संस्थेवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.       पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील इस्लामपुरा येथील रहिवासी तथा मराठवाडा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल जफर अब्दुल सत्तार पटेल यांनी १४ जुलै रोजी ही फिर्याद दिली आहे. यानुसार, संबंधित संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असून तिच्या माध्यमातून  प्राथमिक व माध्यमिक शाळा चालविण्यात येते. २०२० ते २०२५ या कालावधीसाठी संस्थेच्या कार्यकारिणीला मान्यता मिळाली होती. संस्थेचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन बदल अहवाल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आठ जणांनी ...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...

इमेज
  सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आज परळीत शिक्षणप्रेमी व नागरिकांची निदर्शने  परळी, प्रतिनिधी.             जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ , शिक्षणप्रेमी  व पर्यावरण तज्ञ सोनम वांगचूक यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा साठी व केंद्रीय शिक्षण मंत्री महेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यसाठी दिल्ली येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक 17 जुलै रोजी परळीतील शिक्षण प्रेमी व तमाम नागरिकांच्या वतीने सकाळी 11 वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत.      नीट, टीईटी आदी परीक्षांचे होणारे पेपर लिक होत असल्यामुळे करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे .शिक्षण व्यवस्थेतील या गैरकारभाराची जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्री महेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या 18 दिवसापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रो जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन चालू आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि शिक्षणप्रेमी  व पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुक ...

न्यायासाठी शेवटपर्यंत सोबत राहण्याची दिली ग्वाही..

इमेज
ना.पंकजा मुंडेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मदतीचा चेक घेऊन मयत विलास घुलेच्या पत्नी व कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट केज दि. १६ --- तालुक्यातील टाकळी गावचा युवक स्व. विलास घुलेच्या पत्नी व कुटुंबियांची राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाखाचा मदतीचा धनादेश घुलेच्या पत्नीकडे सुपूर्द केला. न्यायासाठी शेवटपर्यंत सोबत राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.   मागील महिन्यात टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या एका घटनेत विलास घुले या युवकाचा हकनाक बळी गेला होता, त्याच्या दुर्देवी मृत्यूमुळे घुले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घुले परिवाराच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत पाठिशी असल्याचे सांगत ना. पंकजाताई मुंडे यांनी त्याच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने पाच लाखाची मदत जाहीर केली होती. आज संध्याकाळी बीड कडे जाताना त्यांनी टाकळीत जाऊन घुले परिवाराची सांत्वनपर भेट घेतली आणि मदतीचा चेकही दिला. न्यायासाठी शेवटपर्यंत सोबत...

बूथ मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या बीएलए -२ कार्यकर्त्यांचा केला सत्कार

इमेज
बूथ मजबूत तर यश निश्चित; एसआयआर मोहिमेत शंभर टक्के योगदान द्या ना. पंकजा मुंडे यांनी घेतला परळी मतदारसंघातील बुथचा आढावा बूथ मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या बीएलए -२ कार्यकर्त्यांचा केला सत्कार परळी वैजनाथ, दि. १६ -- बूथ हा पक्ष संघटनेचा कणा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथशी सातत्याने संपर्क ठेवून जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. शंभर टक्के बूथ मॅपिंग पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेचा विश्वास हीच भाजपची खरी ताकद आहे. सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत सर्वांनी आपापल्या बुथची शंभर टक्के मॅपिंग करावी आणि आपल्या संघटनात्मक कामासह राष्ट्रीय कर्तव्य बजवावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी केले.      सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ येथे भाजपाच्या बी एल ए- दोन म्हणून जबाबदारी असलेल्या ३६२ कार्यकर्त्यांची ना.पंकजा...
इमेज
२०२७-२८ पासून सीईटीद्वारे होणार एएनएम-जीएनएम प्रवेश गुणवत्तापूर्ण व पारदर्शक प्रणालीला चालना मुंबई, दि. १४ : राज्यातील एएनएम आणि जीएनएम परिचारिका पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि एकसमानता आणण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या नियंत्रणाखालील तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न महाविद्यालयांतील एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांचा प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) मार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय ३० जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विविधता असल्याने एकसमान निकषांचा अभाव, पारदर्शकतेचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांवरील अनावश्यक ताण अशा समस्या निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच सीईटी प्रणाली लागू करून गुणवत्तापूर्ण आणि न्याय्य प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत राज्य सामाईक प्...

शासनाने काढले अधिकृत परिपत्रक...

इमेज
  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीदिनी अभिवादन कार्यक्रम मुंबई दि. १५: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. २२ जुलै रोजी जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची जयंती २२ जुलै, २०२६ (बुधवार) रोजी राज्यभरात साजरी केली जाणार आहे. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल. हा आदेश राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसह सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश साप्रविच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
इमेज
अकरावी प्रवेशासाठी १६ जुलैपासून पुढील फेरी; सुधारित वेळापत्रक जाहीर मुंबई, दि. १४ : अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 16 जुलै पासून पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या फेरीत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाची नोंद करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाहीर वेळापत्रकानुसार 16 जुलै दुपारी 3 वाजेपासून 18 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि भाग-2 भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. या फेरीसाठी प्रवेश वाटप प्रक्रिया 19 जुलै रोजी पार पडणार असून 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता प्रवेश यादी आणि कट-ऑफ जाहीर करण्यात येणार आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 20 जुलै ते 22 जुलै या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आह...

पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे केले कौतुक...

इमेज
पुस्तक प्रदर्शन आणि बालसभेचे इंदपवाडी शाळेत यशस्वी आयोजन शिक्षकांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या बाल वाचनालयातील पुस्तकांचे प्रदर्शन आणि बालसभेच्या विषयावर विद्यार्थ्यांनी मांडलेली मते यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे दर महिन्याला बालसभा घेतली जाते आणि वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी दिली जाते. या महिन्याच्या बाल सभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता पाचवीचा विद्यार्थी युवराज गजानन मुंडे उपस्थित होता. कार्यक्रमास अतिथी म्हणून गावच्या सरपंच सौ शालूताई फुलचंदराव मुंडे, पोलीस पाटील सौ मनीषा अनंत मुंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री केशवराव मुंडे, सदस्य श्री वैजनाथराव मुंडे, आलका दिंदोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर वाचनालयासाठी आलेल्या नव्या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांनी 'निसर्ग माझा सखा...

रेल्वे, कृषी, घनकचरा व्यवस्थापनासह विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका

इमेज
ना. पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विकास कामांचा आढावा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराला पुरातन स्वरूप मिळणार ; तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी दिल्या सूचना रेल्वे, कृषी, घनकचरा व्यवस्थापनासह विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका बीड. दि. १५ जुलै----- राज्याच्या पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाची विभागनिहाय आढावा बैठक घेतली. रेल्वे, रस्ते, तीर्थक्षेत्र विकास, कृषी पशूसंवर्धन, पर्यावरण, क्रीडा, नगर परिषद प्रशासन यासह सर्वच विभागांचा त्यांनी आढावा घेतल्यामुळे जिल्हा प्रशासन गतिमान झाले आहे.  बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक आणि सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नगर पालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी मिळणाऱ्या निधीचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नगर-बीड-परळ...

या भव्य मोफत आरोग्य शिबिरामध्ये तीन महत्वाच्या शिबिरांचा समावेश आहे.....

इमेज
आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त  १८०० रु किमतीच्या मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा-डॉ.संतोष मुंडे यासोबतच दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तक्रार निवारण अभियानाचा होणार प्रारंभ परळी (प्रतिनिधी):दिनांक १३ जुलै       आ.धनंजय मुंडे  यांच्या वाढिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांसाठी १८०० रु किंमतीच्या भव्य मोफत रक्त तपासणी आणि कॉम्पुटराईजड नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक १५ जुलै सकाळी १०.०० ते १.०० वाजेपर्यंत श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे करण्यात आले आहे.  त्याच बरोबर दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व तक्रार निवारणअभियानाची  मंगल सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती दिव्यांग कल्याण अभियान मंत्रालयाचे उपाध्यक्ष व या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.संतोष मुंडे यांनी दिली.आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  दिव्यांगाचे कैवारी म्हणून ओळख असणारे तसेच विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर र...

प्रदिप अग्निहोत्री पुरोहित वैद्यनाथ मंदीर परळी वैजनाथ यांचा विशेष लेख......>>>>

इमेज
परळीकरांचे 'लोकनेते' धनंजय मुंडे:  कामाचा माणूस अन् थेट जनसामान्यांशी नातं सांगणारं नेतृत्व परळी वैजनाथ:महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या धडाडीच्या आणि आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जाणारे नेते म्हणजेच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे. मात्र, केवळ एक राजकीय नेता म्हणून नव्हे, तर परळी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा "आपला माणूस, कामाचा माणूस" म्हणून त्यांनी जनमानसात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद ठरली आहे.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यांची जनतेशी असलेली नाळ. ते कितीही मोठे नेते किंवा मंत्री असले, तरी परळीतील प्रत्येक सामान्य नागरिकाशी त्यांचे संबंध कौटुंबिक आहेत. याचे सर्वात जिवंत आणि बोलके उदाहरण म्हणजे प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत पाहायला मिळते.धनंजय मुंडे जेव्हा जेव्हा प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात येतात, तेव्हा तिथल्या स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना आणि भाविकांना राजकीय अंतर कधीच जाणवत नाही. मंदिरात आल्यावर ते तिथल्या ओळखीच्या माणसांना अगद...

प्रदीप खाडे सहसचिव, नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ यांचा विशेष लेख...

इमेज
शिक्षण, राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधणारे लोकनेते : शिक्षणप्रेमी आ.धनंजय मुंडे समाजाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षण हीच सर्वात मोठी शक्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" हा संदेश कृतीत उतरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वामध्ये आ.धनंजय मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राजकारणात सक्रिय भूमिका बजावत असतानाच शिक्षण, सामाजिक न्याय, कला, क्रीडा आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विद्यार्थी हा देशाच्या भविष्याचा शिल्पकार आहे, या विचारातून त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम करताना उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संत भगवानबाबा वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. नाथ प्रतिष्ठान आणि नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्ष...
इमेज
जेजुरीत दिंडीतील ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू; चार गंभीर जखमी श्रद्धा, भक्ती आणि नामस्मरणाच्या वातावरणात सुरू असलेल्या पंढरपूर वारीला सोमवारी सकाळी भीषण अपघाताचे ग्रहण लागले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नांदेडचा ट्रक, सांगलीच्या वारकरी बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने साधारण ५०० मीटर अंतरावर हॉटेल शिपदीप लॉजिंगच्या समोर हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य हाती घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत . धडक इतकी भीषण होती की, तिन्ही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ३ ते ४ वारकरी गंभीर जखमी असून इतर वारकऱ्यांना किरकोळ दु...
इमेज
वारकरी संप्रदाय:भक्ती, बंधुता आणि सामाजिक सलोखा; महम्मद खान महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत परळी | प्रतिनिधी...      आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातून परळी मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या पायी दिंड्यांचे आगमन सुरू असून, शनिवारी संत परमहंस महम्मद खान महाराजांची पालखी दिंडी वैद्यनाथ नगरीत दाखल झाली. विविध धर्म, पंथ आणि समाजघटकांना एकत्र आणणाऱ्या वारकरी परंपरेचा सामाजिक सलोखा व मानवतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून पुन्हा अधोरेखित झाला.       अनिल महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या या दिंडीतील वारकऱ्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन हरिनामाच्या गजरात भक्तीभाव व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथून १९ जून रोजी निघालेली ही दिंडी कारंजा, वाशीम, हिंगोली, औंढा नागनाथ, परभणी आणि गंगाखेड मार्गे परळीत पोहोचली आहे. २० जुलै रोजी ही दिंडी पंढरपूर येथे दाखल होणार असून परळी हा या पालखी सोहळ्याचा २१ वा मुक्काम असल्याची माहिती शिवम चंदेल यांनी दिली.      यावेळी आकाश महाराज लक्षणे यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवास...

भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

इमेज
  वैद्यनाथ नगरीत रुक्मिणी मातेच्या माहेरच्या दिंडीचे जल्लोषात आगमन! मेणा, पालखी आणि विठ्ठलनामाच्या गजराने परळी दुमदुमली; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी परळी |प्रतिनिधी  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील कौंडिण्यपूर येथून निघालेली रुक्मिणी मातेच्या माहेरची पायी दिंडी वैद्यनाथ नगरी परळीत दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. रुक्मिणी मातेचा मेणा, पालखी आणि विठुरायाच्या अखंड जयघोषाने परळीचे वातावरण अक्षरशः विठ्ठलमय झाले. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आणि "रुक्मिणी माता की जय"च्या घोषणांनी शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी भक्तिभावाने नाचत-गात पुढे सरकत होते. दिंडीचे आगमन होताच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. रुक्मिणी मातेचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर येथून निघणाऱ्या या दिंडीला वारकरी संप्रदायात विशेष स्थान आहे. यामुळे दिंडीच्या स्वागतासाठी परळीतील विविध धार्मिक संस्था, वारकरी मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलांची उधळण, आरती आणि जयघोषात दिंडी...
इमेज
  परळी वैजनाथ शहरात १४ जुलै रोजी भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...        आषाढी वारीनिमित्त परळी वैजनाथ शहरात मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीतील सर्व वारकरी तसेच वारकरी महिला भजनी मंडळांच्या सहभागातून हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.सर्व वारकरी-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे  असे आवाहन नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.      अखिल भारतीय वारकरी मंडळ व परळी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमात शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदायाची परंपरा, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण यामुळे परळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. रिंगण सोहळा कॉटन मार्केट यार्ड (जत्रा मैदान),  वेअरहाऊस शेजारी, प...