पोस्ट्स

जुलै ५, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  बंजारा समाज एकता यात्रा रविवारी परळीत संत सेवालाल महाराज चौकात होणार स्वागत-अमर पवार परळी(प्रतिनिधी)  धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल  ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केलेली बंजारा समाज एकता संकल्प यात्रा रविवार दि.१२ जुलै रोजी परळीत येत असुन संत सेवालाल महाराज चौकात या यात्रेचे भव्य स्वागत केले जाणार असुन या यात्रेच्या स्वागतास समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन बंजारा समाजाचे सेवागड विश्वस्त परळी वैजनाथ  अमर पवार यांनी केले आहे.  बंजारा समाज एकता यात्रा बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोवाडा गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड श्री जी महाराज यांनी आयोजित केली असुन ही यात्रा ही ५ जुलै सेवागढ आंध्र प्रदेश येथून निघणार आहे १८ राज्यातुन बंजारा एकतेचा संदेश देत दि.२६  जुलै रोजी दिल्ली येथे पोंहोचणार आहे.यात्रेदरम्यान भगवंतसेवक किशन राठोड यात्रेनिमित्त देशातील बंजारा समाजांना पांढर्या ध्वजाखाली एकत्र आणण्याचा संकल्प करणार आहेत.यात्रेचे नियोजन प्रवीण ...
इमेज
महायुती सरकारचा मोठा निर्णय! आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्यांची थेट नियुक्ती होणार, समीकरणे बदलणार महाराष्ट्र सरकारने महानगरपालिकांच्या उदाहरणाचे अनुकरण करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्यसंख्येच्या दहा टक्के आणि पंचायत समिती सदस्यसंख्येच्या २० टक्के सदस्य हे नामनिर्देशित सदस्य असतील. ग्रामीण भागात सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि सक्षम व्यक्तींना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे उद्दिष्ट आहे. नामनिर्देशित सदस्यांच्या नावाने हे लोकांच्या राजकीय पुनर्वसनाचे साधन बनेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. १९९३ मध्ये पंचायत राज कायदा लागू होईपर्यंत नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याची पद्धत अस्तित्वात होती, परंतु नंतर ती बंद करण्यात आली. आता राज्य सरकार ती पुन्हा सुरू करणार आहे. या निर्णयानंतर नागपूर जिल्हा परिषदेत सहा नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली जाईल. २० टक्के पंचायत समिती सदस्यांची नियुक्ती केली जाईल. याबाबतचा कायदा लवकरच विधानसभेत मंजूर केला जाईल. महसूल मंत्री चंद्रशेखर ...
इमेज
गांज्याच्या शेतीवर चकलांबा पोलिसांची धाड ;  ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त  गेवराई, प्रतिनिधी: चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या टीमने अवैध धंद्यावरील कारवाया आणखी गतिमान केल्या असून शुक्रवारी (दि.१०) गांज्याची शेतीच पोलिसांनी उघडकीस आणली आहे.या कारवाईत तब्बल ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.    चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरळेगावच्या गट ११३ मधील उसाच्या शेतात गांज्याची लागवड करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमला पाठवून खात्री केली असता उसाच्या शेतात गांज्याची लहान मोठी अशी २५३ झाडे लावल्याचे समोर आले.यात काही झाडांचे वजन १८४.४ किलो असून त्याची किंमत ४८ लाख १० हजार व ४ किलो ३०० ग्रॅम सुका गांजा ज्याची किंमत २ लाख ६ हजार ४०० रुपये तसेच ४५० ग्रॅम निमसुका गांजा ज्याची किंमत ११ हजार २५० रुपये असून एकूण ४८ लाख २७ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे...
इमेज
स्व.अजितदादा पवार जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. धनंजय मुंडे व ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने १५ ते २९ जुलैदरम्यान लोककल्याणकारी सेवा पंधरवडा-- नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी       नगर परिषद परळी वैजनाथच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ‘लोककल्याणकारी सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, आरोग्य, पर्यावरण व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.       या लोककल्याणकारी सेवा पंधरवड्याची सुरुवात १५ जुलै रोजी होणार आहे. यानिमित्ताने शासकीय- निमशासकीय कार्यालये याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून याचा शुभारंभ वैद्...

पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून अभिनंदन...

इमेज
चार तासांत अल्पवयीन मुलाचा शोध; परळी ग्रामीण पोलिसांची तत्पर कारवाई परळी वैजनाथ, प्रतिनिधी —     परळी तालुक्यातील नागापूर येथील १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत त्याचा शोध घेण्यात परळी ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या तत्पर कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागापूर येथील उर्मिला सुभाष सौंदडे (वय ४४) यांनी आपल्या मुलाला अज्ञात व्यक्ती फूस लावून घेऊन गेल्याची तक्रार शुक्रवारी (दि. १०) परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक एम. डी. शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुलाच्या हालचालींचा मागोवा घेतला. त्यानुसार एक पथक गंगाखेड परिसरात तर दुसरे पथक परळी शहरात शोधमोहीम राबवत होते.     तपासादरम्यान संबंधित मुलगा परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात आढळून आला. त्यानंतर त्याला सुरक्षित...

SIR ला दोन महिन्यांची मुदतवाढ द्या.... यासह अन्य महत्त्वपूर्ण मागण्या

इमेज
  पात्र मतदारांच्या संरक्षणासाठी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स ची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव! परळी वैजनाथ, प्रतिनिधी १० जुलै : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान पात्र मतदारांचे हक्क अबाधित राहावेत, यासाठी फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम्स (FMM)च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने नोंदणी प्रक्रियेसाठी देण्यात आलेला कालावधी अपुरा असल्याचे नमूद करत किमान दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली. मुसळधार पाऊस, शेतीची कामे, स्थलांतर आणि पुनर्विकासामुळे अनेक नागरिकांना नोंदणी प्रक्रियेत अडचणी येत असल्याचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांच्यावरील वाढता कामाचा ताण कमी करण्यासाठी त्यांना इतर शासकीय कामांतून तात्पुरती सूट द्यावी, आवश्यकतेनुसार सहाय्यक BLO नियुक्त करावेत आणि त्यांना अद्ययावत प्रशिक्षण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच BLO यांची संपर्क माहिती आणि कार्यक्षेत्राची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याची सूचनाह...

मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक कामावर पूर्णवेळ लक्ष देण्याच्या सूचना

इमेज
SIR-2026| विशेष पुनरीक्षणासाठी बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना इतर कामांतून मुक्त करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना निवडणूक कामावर पूर्णवेळ लक्ष देण्याच्या सूचना बीड | प्रतिनिधी       भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-2026 कार्यक्रमासाठी बीएलओ (Booth Level Officer) म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना इतर प्रशासकीय व शालेय कामांमधून मुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, २४ जून ते २६ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओंना मतदार यादी पुनरीक्षणाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी Enumeration Forms (EF) भरणे, माहिती संकलन, पडताळणी व अन्य निवडणूकविषयक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.या कालावधीत बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना कोणतेही अतिरिक्त प्रशिक्षण, बैठक, राष्ट्रीय योजना, सर्वेक्षण किंवा इतर प्रशासकीय कामे देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेतील आ...

मागण्या मान्य करा अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

इमेज
आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियने पाळला 'काळा दिवस' ! परळी वैजनाथ | प्रतिनिधी        देशभरातील आशा सेविका व गटप्रवर्तकांनी १० जुलै रोजी 'काळा दिवस' पाळत आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियने परळीत केलेल्या या आंदोलनात न्याय मागण्यांसाठी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.       बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मार्च २०२५ मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेली आशा सेविकांच्या प्रोत्साहनपर मानधनवाढीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. वाढीव प्रोत्साहन रक्कम तत्काळ अदा करावी, गेल्या एका वर्षाची थकबाकी द्यावी तसेच यासंदर्भातील शासन आदेश तातडीने काढावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. ४ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) च्या मिशन स्टिअरिंग ग्रुपच्या बैठकी...
इमेज
 ना. पंकजा मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट बीड जिल्हयातील विविध विकासाच्या मुद्द्यावर चर्चा ; परळीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचेही दिले निमंत्रण मुंबई दि. १० --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन बीड जिल्हयाच्या विविध विकास प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली. परळी येथे होणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाचे निमंत्रण त्यांनी यावेळी सुनेत्राताईंना दिले.   ना. पंकजाताई मुंडे यांनी आज दुपारी देवगिरी बंगल्यावर उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. या प्रसंगी बीड जिल्ह्याच्या विविध विकासकामांच्या संदर्भात त्यांच्याशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली.या भेटी दरम्यान, परळी वैजनाथ येथे नव्यानेच होत असलेल्या 'पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या' भूमिपूजन सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रणही त्यांनी सुनेत्राताईंना दिले. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि लोककल्याणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास ना.पंकजाताईंनी यावेळी व्यक्त केल...

१४ संशयित ताब्यात: संभाजीनगरचे १० संशयित...पाकिस्तानी गॅंगस्टरशी संबंध असल्याचा संशय

इमेज
ATS Raid Marathwada | बीड मधून एकाला उचलले ;छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये एटीएसची एकाचवेळी छापेमारी  पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोग्रा गँगशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी (दि. १०) छत्रपती संभाजीनगरसह बीड आणि जालना येथे एकाचवेळी छापेमारी केली. पहाटेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या या धाडीत तब्बल १४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात एटीएसने गेल्या तीन महिन्यांत केलेली ही दुसरी कारवाई असून, एनआयएच्या पथकानेही वाळूज येथे गेल्या महिन्यात अशीच एक कारवाई केली होती. सोशल मीडियाद्वारे हे संशयित शहजाद भट्टी गँगच्या संपर्कात असल्याचा एटीएसला दाट संशय आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी असून, तो सध्या दुबईत बसून आपली गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे. देशातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा डाव आहे. त्याच्याशी सोशल मीडियाद्वारे काही तरुण संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात उघ...
इमेज
औषध घेण्यासाठी रिक्षा थांबवली अन् अज्ञात चोरट्याने लंपास केली १ लाखांची रक्कम  बीड शहरातील बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकलसमोरून एका रिक्षातून तब्बल १ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   माणिक दत्तात्रय रांजवण (वय ३६, रा. आहेर वडगाव, ता.जि. बीड) हे त्यांचे मावस भाऊ कृष्णा डरपे यांच्या शिवम ॲग्रो एजन्सी या दुकानात मजुरी काम करतात. त्यांचे मावस भाऊ गावी गेले असल्याने माणिक यांनी दिवसभर दुकान सांभाळले. रात्री आठ वाजेच्या सुमारास दिवसभराच्या खत व बी-बियाणांच्या विक्रीची झालेली १ लाख रुपयांची रोकड एका बॅगेत भरून ते रिक्षाने (क्रमांक MH 23 X 5360) धांडे नगर येथे देण्यासाठी निघाले.   प्रवासादरम्यान बार्शी रोडवरील राजलक्ष्मी मेडिकलसमोर त्यांनी औषध घेण्यासाठी आपली रिक्षा थांबवली आणि ते मेडिकलमध्ये गेले. औषधे घेऊन परत आल्यावर त्यांना रिक्षात ठेवलेली पैशांची आणि टिफिनची बॅग गायब झाल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेऊनही बॅग न सापडल्या...
इमेज
थरारक : घाटात फिल्मी स्टाईलने कुटुंबाचे अपहरण; पावणेदोन लाखांची लूट, सहाजणांविरुद्ध गुन्हा बीड, ता. १० : मांजरसुंबा घाटात कार अडवून कोयत्याचा धाक दाखवत एका कुटुंबाचे अपहरण करून त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याची अंगठी तसेच एटीएम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध अपहरण, दरोडा, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील श्रीपाद गंगाधरराव कुलकर्णी (वय ५०) हे त्यांचे मानस-वडील विजयसिंह रणनवरे आणि मानस-आत्या सुवर्णमाला रणनवरे यांच्यासह कारने वालवड येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. मांजरसुंबा घाट परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या आरोपींनी त्यांची कार अडवली. उदयसिंह उर्फ सोनू सत्यजितसिंह जाधव (रा. गणेगाव, ता. भूम), अझर सय्यद, निखिल, राहुल काळे (सर्व रा. भूम, जि. धाराशिव) तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी कुलकर्णी यांना कोयत्याचा धाक दाखवत तिघांनाही जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवून अपहरण केल्याचे फिर्यादीत नम...

एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर ; ग्रामविकास विभागाचा जीआर निर्गमित

इमेज
 ना. पंकजा मुंडेंमुळे परळी तालुक्यातील कौठळी, नंदनज, दौनापूर, डिग्रससह पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर ; ग्रामविकास विभागाचा जीआर निर्गमित परळी वैजनाथ दि. ०९ राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्यामुळे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत मिळणार असून त्यासाठी एक कोटी १० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. ग्रामविकास विभागाने तसा जीआर निर्गमित केला आहे.     ना. पंकजाताई मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत परळी तालुक्यातील ज्या गावांना ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नाही अशांना स्वतंत्र इमारत द्यावी अशी शिफारस केली होती, त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार कौठळी (२५ लाख) नंदनज (२० लाख) डिग्रस (२० लाख) दौनापूर (२५ लाख) आणि परचुंडी (२० लाख)  या ग्रा.प. ना निधी मंजूर झाला आहे, यातील परचुंडी ग्रामपंचायतीला यापूर्वी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला असल्याने त्याऐवजी दादाहरी वडगाव ग्रा.पं.सुचविण्यात आली आहे, त्याचे शुध्दीपत्रक लवकरच निर्गमित होणार आहे. दरम्यान गेल्या कित्येक ...

यापुर्वीही घडली होती अशीच घटना...ऑटो प्रवासाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर!!!

इमेज
खळबळजनक : बँकेतून दीड लाखाची रक्कम काढताच दोन ते तीन जणांनी ऑटोत बसवून महिलेचे परळीतून केले अपहरण परळी वैजनाथ | प्रतिनिधी       परळीतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतून दीड लाख रुपये काढून घराकडे निघालेल्या परळी शहरातील साठेनगर परिसरातील एका महिलेचे अज्ञात दोन ते तीन आरोपींनी अपहरण करून तिला जबरदस्तीने ऑटोरिक्षामध्ये बसवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक बसून दागिने लुटण्याची घटना परळीमध्ये घडली होती या घटनेचीच पुनरावृत्ती आजच्या घटनेने झाली आहे त्यामुळे ऑटो चा प्रवास आणि सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे दरम्यान घडलेली घटना ही  संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दीतील असताना संभाजीनगर व शहर पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही मात्र परळी ग्रामीण पोलिसांनी याबाबतीत तत्परता दाखवत महिलेचा शोध घेतला. ही महिला गंगाखेड येथे मिळून आली आहे.          मिळालेल्या माहितीनुसार, परळी वैजनाथ शहरातील साठेनगर येथील विकी वसंत वाघमारे यांनी पोलिसांना माहिती दिली की, त्यांची आई तारा...

हरिहर ऐक्य क्षेत्र परळी वैजनाथ "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने दुमदुमले

इमेज
वैद्यनाथ नगरीत वारीचा आनंदसोहळा; संत गजानन महाराज पालखीचे उत्साहात स्वागत हरिहर ऐक्य क्षेत्र परळी वैजनाथ "ज्ञानोबा-तुकाराम" च्या जयघोषाने दुमदुमले परळी वैजनाथ | प्रतिनिधी वैद्यनाथ नगरीत बुधवारी वारकरी भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे परळी शहरात आगमन होताच भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने स्वागत केले. पालखी आगमनाच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवर वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत आणि "ज्ञानोबा-तुकाराम" तसेच "गण गण गणात बोते"च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. हरी-हर ऐक्याचे प्रतीक असलेल्या परळी वैजनाथ नगरीत वारकरी संप्रदायाच्या या आगमनाने भक्ती, समता आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. फुलांनी सजविलेल्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करत संत गजानन महाराजांना अभिवादन केले. शहरातील विविध संस्था, नागरिक आणि वारकरी मंडळांच्या वतीने...

✍️ प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख.....

इमेज
प्रबोधनाचा दीपस्तंभ : प्रा. डॉ.बळीराम पांडे यांची राष्ट्रीय वाटचाल एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व केवळ तिच्या पदावर, पुरस्कारांवर किंवा सन्मानांवर मोजले जात नाही; ते तिच्या संघर्षातून, मूल्यनिष्ठ जीवनातून आणि समाजासाठी दिलेल्या योगदानातून अधोरेखित होत असते. काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याने स्वतःपुरती मर्यादित राहत नाहीत, तर ती एका विचाराची, एका चळवळीची आणि एका सामाजिक ध्येयाची ओळख बनतात. प्रा. डॉ. बळीराम पांडे हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. मराठवाड्याच्या मातीत घडलेले हे अभ्यासू प्राध्यापक, परिवर्तनवादी विचारांचे वाहक, साहित्यिक, कुशल संघटक आणि समाजप्रबोधनाचे अखंड प्रेरणास्त्रोत म्हणून आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता पावले आहेत. अत्यंत सामान्य परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, जिद्द आणि ध्येयनिष्ठेचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. बालपणीचा "बळी" हा मुलगा शिक्षणाच्या बळावर, अथक परिश्रमाच्या जोरावर आणि संकटांशी झुंज देत उच्च शिक्षणाच्या शिखरावर पोहोचला. जीवनात आलेल्या अभावांनी त्यांना खचवले नाही; उलट प्रत्येक संकटाने त्यांना अधिक सक्षम, अधिक संवेदनशील आणि अधिक ...

निवडीबद्दल सत्कार.....

इमेज
मनोहर कराड यांच्या वतीने दत्तात्रय महाराजांचा हृदय सत्कार   परळी वैजनाथ(प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा साहित्यिक ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांची नुकतीच वारकरी संप्रदाय राष्ट्रीय अध्यक्ष ग्रंथ प्रकाशन समिती यांची निवड झाले बद्दल त्यांचा हृदय सत्कार येथील सामाजिक कार्यकर्ते तथा  एलिट क्लब सदस्य, एलआयसी ऑफ इंडिया चे श्री मनोहर कराड यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला.        यावेळी परळी वकील संघांचे अध्यक्ष ॲड.डी.पी. कडबाने साहेब,ॲड.एच.व्हि.गुट्टे साहेब, ॲड. व्हि.बी.नागरगोजे ॲड.आर.व्ही.गित्ते,ॲड.आर.व्ही.देशमुख,ॲड.व्हि.एस.फड, ॲड. पि.एम.सातभाई,ॲड.धनाजी कांबळे,ॲड.दिनकर वाघमोडे, ॲड. गजानन पारेकर,ॲड.राहुल सोळंके,  ॲड.बालाजी कराड, ॲड.दत्तात्रय कराड,ॲड.साळवे आदिंचे उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.

कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन समर्थन समिती, परळी

इमेज
  परळीकरांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी; टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी परळी / प्रतिनिधी  NEET आणि इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या प्रकरणांवरून देशभरात वातावरण तापलेले असतानाच, आता महाराष्ट्रातील 'शिक्षक पात्रता परीक्षा' (TET) पेपरफुटीचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 'कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन समर्थन समिती, परळी वै.' यांच्या वतीने थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले आहे. दिल्लीतील आंदोलनाचा दाखलासमितीने दिलेल्या निवेदनानुसार, NEET आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ गेल्या २० ते २२ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या सहभागातून देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली जात आहे. मात्र, केंद्र सरकार यावर कोणती...

पंकजा मुंडे यांनी नेमकं काय केलं आवाहन?

इमेज
तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी भेटवस्तू; वाढदिवसाचा बडेजाव नको - पंकजा मुंडे हारतुरे, शुभेच्छाभेट, भेटवस्तू नकोत; पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे आवाहन मुंबई  | प्रतिनिधी          राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना  वाढदिवस साजरा करु नये असे आवाहन केले आहे. तुमचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेटवस्तू आहे, असे सांगत त्यांनी हारतुरे, पुष्पगुच्छ, शुभेच्छाभेटी आणि भेटवस्तूंऐवजी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले आहे.          पंकजाताई मुंडे यांचा २६ जुलै रोजी वाढदिवस असतो.   वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याऐवजी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान, जलसंवर्धन तसेच पर्यावरण संरक्षणाशी संबंधित उपक्रम राबवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक कार्यातून वाढदिवस साजरा केल्यास त्याला अधिक अर्थ प्राप्त होईल, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सत्कार समारंभ, हारतुरे किंवा भेटवस्तू ...

निवड.....!!!!

इमेज
परळी वैजनाथ इनरव्हील क्लबची नुतन कार्यकारिणी जाहीर: अध्यक्षपदी सौ. आशा धुमाळ  परळी वैजनाथ : प्रतिनिधी.... सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या इनरव्हील क्लब परळीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सौ. आशा उत्तम धुमाळ तर सेक्रेटरी म्हणून सौ. शैलजा बाहेती यांची निवड करण्यात आली आहे.       परळी वैजनाथ इनरव्हील क्लब मेंबर्सची नुकतीच बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून सौ. आशा धुमाळ, सेक्रेटरी शैलजा बाहेती यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष सौ. उमा समशेट्टी, इडिटर सौ. अनिता धुमाळ, ट्रेझरर सौ. सुरेखा बेंडसुरे, आयएसओ सौ. तारा अग्रवाल तर सीसी सौ. मधुबाला कांकरिया यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या अध्यक्षा अ‍ॅड. शुभांगी गिते यांच्यासह पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या.
इमेज
  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती, साठे नगरच्या अध्यक्षपदी सुनिल मस्के परळी वैजनाथ, प्रतिनिधी : श्रमिक, कष्टकरी आणि वंचित समाजाचा बुलंद आवाज असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त साठे नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात बैठक पार पडली. बैठकीत यंदाचा सार्वजनिक जयंती उत्सव सामाजिक सलोखा, प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बबन मस्के हे होते. विजयकुमार शिंदे व गंगाधर मस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. *समितीच्या अध्यक्षपदी सुनिल मस्के, उपाध्यक्षपदी निवास मस्के, सचिवपदी गुलाब शिरसागर, कोषाध्यक्षपदी संतोष मस्के तसेच सहसचिवपदी महादेव मस्के आणि नागेश मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.* नवनियुक्त अध्यक्ष सुनिल मस्के यांनी बोलताना सांगितले की, "लोकशाहीर ...

धडक देणारी पिकअपही झाली पलटी, कन्हेरवाडी घाटातील घटना

इमेज
भरधाव वाहनाची मोटार सायकलला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर धडक देणारी पिकअपही झाली पलटी, कन्हेरवाडी घाटातील घटना परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भरधाव बोलेरो पिकअप गाडीने मोटार सायकलला जोराची  धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याचे सुमारास कण्हेरवाडी घाटात घडली. घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.       या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी रात्री 8.30 वाजण्याचे सुमारास शहरातील सावतामाळी नगर भागात राहणारे गणेश मुरुळे, गणेश खोले व मुंजा मिसाळ हे तीन युवक मोटार सायकल क्र. एम. एच. ४४ एए ३०६४ यावरून कामानिमित्त अंबाजोगाईकडे जात असताना कन्हेरवाडी घाटात हॉटेल नंदनवन जवळ त्यांच्या गाडीला एका बोलेरो पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गणेश मुरुळे, मुंजा मिसाळ व गणेश खोले हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी गणेश मुरुळे, मुंजा मिसाळ यांना म...
इमेज
प.पू. वामनानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी      श्री चिन्मयानंद संस्थान, उमरखेड पूर्व मठाधिपती ब्रह्मलीन परमपूज्य श्री वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून सर्व शिष्यवृंद, भाविक व भक्तांनी उपस्थित राहून  लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.       कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत प्रतिमेचा व पादुकांचा अभिषेकाने होईल. त्यानंतर सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत श्री विश्वंभर घोंडोपंत पाठक सिरसाळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत 'परमहंस तुकामाई चरित्र आणि विश्वगुरू भारत' या विषयावर प्रवचन होणार आहे. सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत पंचपदी व आरतीचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर दुपारी १२.०० वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बडवे सभागृह, देशपां...

गौरवास्पद: सर्व स्तरांतून अभिनंदन!!!!

इमेज
वारकरी संप्रदाय ग्रंथ प्रकाशन समितीवर राष्ट्रीयअध्यक्ष म्हणून ॲड. दत्तात्रय आंधळे यांची निवड नाशिक (प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा ह.भ.प.ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांची निवड वारकरी संप्रदाय राष्ट्रीय अध्यक्ष ग्रंथ प्रकाशन समितीवर वारकरी संप्रदाय संघटना राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.श्री अण्णासाहेब आहेर महाराज हिसवळकर यांनी केली. श्री दत्तात्रय महाराज आंधळे हे महाराष्ट्रभर वारकरी पध्दतीने कीर्तनाचे माध्यमातून प्रचार व प्रसार भागवत कथाकार,श्रीदत्त कथा प्रवक्ते आहेत. प्रकाशित पुस्तके *ज्ञानदेवांची गुरुगीता *ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा *श्री संत जगमित्र नागा चरित्र *आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध -वाट *जाणिवेच्या कळा * सार्थ विवेकसिंधु या मराठीतील आद्यकवी मुकुंदराज रचित  ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. * नुकतेच मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीने व आषाढी कार्तिकी वारी महामंडळ आयोजित समरसते चे संत या कार्यक्रमात दत्तात्रय आंधळे यांचे "अत्यंत दुर्मिळ संत जगमित्रनागा अभंग गाथा"चे प्रकाशन इंदौर येथे प्रकाशन झाले. संत जगमित्रनागा चरित्र  पुणे विद्यापीठात स...
इमेज
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस दौंडपर्यंतच धावणार; रेल्वे प्रशासनाचा निर्णय परळी वैजनाथ (प्रतिनिधी): प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून, गाडी क्रमांक 17614 नांदेड–पनवेल एक्स्प्रेस ही 7 जुलै 2026 रोजी नांदेडहून सुटल्यानंतर केवळ दौंड स्थानकापर्यंतच धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या संदेशानुसार, कार्यान्वयनासंबंधी (Operational Reasons) कारणांमुळे या गाडीचा प्रवास दौंड येथेच समाप्त (Short Terminated) करण्यात आला आहे. त्यामुळे दौंडनंतर पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, उद्या (8 जुलै) आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मराठवाड्यासह विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी पुणे आणि आळंदीकडे रवाना झाले आहेत. अशा वेळी नांदेड–पनवेल एक्स्प्रेस दौंडपर्यंतच धावणार असल्याने वारकऱ्यांसह इतर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.  या अचानक झालेल्या बदलामुळे परळी, लातूर रोड, उस्मानाबाद आणि मार्गावरील इतर स्थानकांवरील प्रवाशांच...
इमेज
परळी रेल्वे विकास समितीने दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक संजयकुमार श्रीवास्तव यांची घेतली भेट दक्षिण मध्य रेल्वेच्या खासदारांच्या बैठकीत रेल्वेसंबंधी मागण्यांचे दिले निवेदन  परळी वैजनाथ( प्रतिनिधी): दक्षिण मध्य रेल्वेची सुमारे दोन वर्षांनंतर नांदेड विभागातील खासदारांची मुख्य व्यवस्थापकांसमवेत बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती.     परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक संजयकुमार श्रीवास्तव यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण,खासदार डॉ.अजित गोपछडे,परभणीचे खासदार बंडू जाधन यांना भेटून  निवेदन सादर केले.       दक्षिण मध्य रेल्वेच्या महसूल देणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश असूनही दक्षिण मध्य रेल्वे  दुजाभाव करूनअपेक्षित सुविधा उपलब्ध नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली....

गौरवास्पद......सर्व स्तरातून अभिनंदन!!!!

इमेज
  परळीचे कवी दिवाकर जोशी यांची गझल विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात परळी वैजनाथ : एमबी न्यूज वृत्तसेवा...       डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या यावर्षीपासून लागू होणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांच्या ' सलतो उरात काटा' या गझल संग्रहातील 'विठ्ठल मला निरंतर' या लोकप्रिय गझलेची निवड झालेली आहे         या विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या जवळपास ४५० महाविद्यालयाच्या बी.ए.(मराठी) तृतीय वर्षासाठी 'मराठी गझल' असा ५० गुणांचा स्वतंत्र अभ्यासक्रम निर्धारित केला असून त्यामध्ये गझलेच्या सर्वांगीण अभ्यासाबरोबरच महाराष्ट्रातील काही निवडक गझलकारांच्या गझलांचा अंतर्भाव केला आहे. ही मराठी गझलेच्या दृष्टीने अत्यंत उल्लेखनीय आणि सन्मानाची बाब आहे.       परळी येथील दिवाकर जोशी हे एक नामांकित गझलकार असून ते यापुर्वीही साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. देशपातळीवरील विविध साहित्य संमेलने आणि कविसंमेलनांसाठी ते निमंत्रित असतात. त्यांची हीच गझल महाराष्ट्र शास...

सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद!!!

इमेज
  गोड बोलून विश्वास जिंकला अन् हातचलाखीने दागिने चोरले -परळीतील सराफा दुकानातून साडेपाच लाखांचे सोने लंपास परळी वैजनाथ : प्रतिनिधी....       परिचित व्यक्तीची ओळख सांगत विश्वास संपादन करून सराफ दुकानातून टप्प्याटप्प्याने सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार परळी शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत ५ लाख ७१ हजार ८६ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथनगर येथील गोविंद माधवराव मुंडे (वय ४०) हे स्टेशन रोडवरील एक मिनार चौक परिसरात 'मुंडे ज्वेलर्स' नावाचे सोन्या-चांदीचे दुकान चालवितात. १७ एप्रिल २०२६ रोजी विठ्ठल सानप (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) हा संशयित दुकानात आला. त्याने मुंडे यांच्या परिचयातील व्यक्तीची ओळख सांगून विश्वास संपादन केला. यानंतर १७ एप्रिल, २८ मे, २ जून, २३ जून आणि २७ जून २०२६ या दिवशी तो दागिने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. या काळात त्याने संधी साधून विविध सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. संशयित प्रत्येक वेळी एकटाच ये...

प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही

इमेज
  शिक्षक बदली प्रकरण ; दुसर्‍या दिवशीही हिवरा (गो.) ग्रामस्थांनी शाळा केली बंद  नियुक्त रद्द करावी अथवा रिक्त जागा भरण्याची मागणी  सिरसाळा  : परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती बदली केली असल्याने संतप्त ग्रामस्थ व शालेय व्यावस्थापन समितीने एकत्र येत शाळेला टाळे ठोकले आहे. दिनांक ४ जुलै रोजी हिवरा ग्रामस्थांनी अंदोलन करत  शाळेला कुलूप ठोकले होते व काल दिनांक ६ जुलै देखील संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकत्र येत अंदोलन करत शाळा बंद केली . शिक्षक बदली प्रकरणी संबंधित प्रशासन लक्ष देत नाही. या मुळे हिवरा ग्रामस्थ अधिकच आक्रमक होत आहेत. भानुदास संभाजी गुडदे असे प्रतिनियुक्ती झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. लाडझरी केंद्र अंतर्गत असलेल्या दौंडवाडी येथे त्यांची नियुक्त केली आहे. सदरील नियुक्ती माजी आमदार संजय दौंड यांच्या सूचनेवरुन तसेच शालेय व्यावस्थापन समिती दौंडवाडी यांच्या निवेदन मागणी वरुन संबंधित शिक्षकाची प्रतिनियुक्ती केली असल्याचे गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती परळी वै...
इमेज
संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्याची परळी संपादक संघाची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-दै.जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी परळी संपादक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  या संदर्भात परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांच्या मार्फत पोलीस महानिरिक्षक छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) यांना आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक जगमित्र ह्या दैनिकाचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावर राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष समिर काझी यांच्या सहाय्याकाने गुन्हा दाखल केला आहे. दैनिक जगमित्र चे संपादक बालासाहेब कडबाने यांनी आपल्या दैनिकातून सत्य व पारदर्शक बातम्या प्रसिद्ध करुन लोकांसमोर व प्रशासना समोर सत्य मांडले आहे. काही दिवसापुर्वी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समिर काझी यांच्या भ्रष्टाचारी कारभाराबद्दल दैनिक जगमित्र दैनिकात वृत्त छापले परंतु लोकांसमोर व प्रशासना समोर पोलखोल झाल्याने या रागातून समिर काझी यांनी त्यांचे सहाय्यकाच्या मार्फत तक्रार देऊन दैनिक जगमित्र चे संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावर...

पोलीस उपनिरीक्षक राजाराम शेळके यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्यात पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व प्रा. रवींद्र जोशी यांचे गौरवोद्गार

इमेज
पो.उपनि. राजाराम शेळके यांनी नेहमी कर्तव्याला प्राधान्य दिले– पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे ३६ वर्षे निष्कलंक सेवा हीच राजाराम शेळके यांची खरी ओळख- पत्रकार प्रा. रविंद जोशी पोलीस उपनिरीक्षक राजाराम शेळके यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्यात पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व प्रा. रवींद्र जोशी यांचे गौरवोद्गार परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):-पोलीस दलातील सेवा ही २४ तासांची असते. अशा कठीण आणि तणावपूर्ण सेवेत राजाराम शेळके यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. वैद्यनाथ मंदिर पोलीस चौकीत कार्यरत असताना देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची आणि दर्शन व्यवस्थेची त्यांनी उत्कृष्ट जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कामाबाबत माझ्याकडे कधीही एकही तक्रार आली नाही. त्यांनी केलेले प्रत्येक काम परिपूर्ण आणि विश्वासार्ह होते.असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी काढले. तर आपल्या "३६ वर्षांच्या सेवाकाळात एकही शिस्तभंगाची कारवाई न होणे हीच राजेभाऊ शेळके यांच्या चारित्र्याची आणि कर्तव्यनिष्ठेची सर्वात मोठी पावती आहे. उलट उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना सुमारे २८ वेळा पोलीस दलाकडून गौरविण्यात आले असल्य...

पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कारवाईचा निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी

इमेज
संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावरील कथित खोटा गुन्हा मागे घ्या; सिरसाळा पत्रकार संघाची पोलीस प्रशासनाकडे मागणी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कारवाईचा निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी परळी वैजनाथ / सिरसाळा, दि. ५ जुलै : 'दैनिक जगमित्र'चे संपादक बाळासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला कथित खोटा गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी सिरसाळा पत्रकार संघाने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, अशीही भूमिका संघटनेने मांडली आहे. पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे लक्ष्य करणे हे लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी घातक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि बाळासाहेब कडबाणे यांच्यावरील कथित खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात ...