ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी
अंगणवाडी मदतनीस महिलेस ब्लॅकमेल करीत ११ महिन्यात वारंवार लैंगिक अत्याचार
आरोपीला पोलीस कोठडी ; गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढले
केज :- केज तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिलेस लस्सीतून गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढला. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करीत ११ महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील संभाजीनगर भागातील विकास लक्ष्मण खाडे याची केज तालुक्यातील एका गावात कार्यरत असलेल्या ३० वर्षीय अंगणवाडी मदतनीस महिले सोबत ओळख झाली होती. त्याने या ओळखीचा फायदा घेऊन पीडित महिलेस लस्सीतून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाल्या नंतर त्याने तिचे नको त्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढले. हे फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देऊन विकास खाडे याने मे २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या ११ महिन्याच्या कालावधीत कळंब येथील बालाजी लॉज, प्रेरणा लॉज, केज येथील सागर प्रताप लॉज आणि पीडितेच्या गावी नेऊन वारंवार बलात्कार केला. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने आरोपी विकास खाडे विरुद्ध दिलेल्या तक्रारी वरून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गु र नं १२२/२०२६ भा न्या सं ६४(१),६४(२) (एम)गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्या नंतर आरोपी विकास खाडे यास कळंब येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक भारत बर्डे हे करीत आहेत.आरोपीला केज न्यायालया समोर हजर केले असता त्यास तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा