#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकराजा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी     

        


 परळी प्रतिनिधी.. जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जे व्ही जगतकर हे उपस्थित होते. तसेच   उपप्राचार्य प्रा डी के आंधळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ माधव रोडे, समन्वयक  प्रा उत्तम कांदे, कार्यालयीन अधीक्षक  सौ सुनिता धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी के शेप यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि कर्तृत्वावर थोडक्यात प्रकाश टाकला. त्यात त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणं घेतल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भात विशेषतः सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या करवीर संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला . प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून राजर्षी शाहूं महाराजांनी  विद्यार्थ्याकरीता कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन करून वसतिगृह चळवळ सुरू केली . शिवाय नाशिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने वसतिगृहे स्थापन केली. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे व्ही जगतकर यांनी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून  कोल्हापूर संस्थानात राधानगरी धरण बांधले, त्याचबरोबर त्यांनी जाती अंताची चळवळ सुरू केली.  जातीय विषमता , अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे असा विचार त्यांचा होता. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन व आभार डॉ बी के शेप यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्त्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....