गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर; परळी पॅटर्न तयार करणार- किरण गित्ते IAS
नात्याला काळीमा: आईसोबत आजोळी आलेल्या तीन वर्षाच्या निरागस नातीवर नराधम आजोबाने केला अत्याचार
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक विवाहित तरुणी ही तिच्या माहेरी आलेली असताना त्या विवाहित तरुणीच्या वडिलांनी स्वतःच्याच मुलीच्या तीन वर्ष वयाच्या चिमुकलीच्या गुप्तंगात बोट घालून तिच्यावर अत्याचार केला आहे. ही घटना दि. १६ ते दि. २५ एप्रिल दरम्यान अनेकवेळा कुकर्म केले आहे. त्या चिमुकलीने तिला त्रास होऊ लागल्याने हा प्रकार आईला सांगितला. त्या नंतर त्या विवाहित मुलीने तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. ११८/२०२६ भा. न्या. सं. ६४(२) (एफ)(आय)(एम), ६५(२) या सह पोक्सोचे कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दि. १ मे रोजी रात्री नराधम लिंगपिसाट आजोबाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा