आरोपी पोलिसांच्या ताब्यात ....

इमेज
  केजमध्ये पुन्हा अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! शरीर संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ! केज :- केज तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचाराची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला घरी बोलावून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आई, वडील भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. केज शहरातील एका भागात राहत असलेली शालेय शिक्षण घेत असलेली १५ वर्ष १० महिने वयाच्या मुलीचा पंधरा दिवसापूर्वी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १:०० ते ३:०० वा. च्या दरम्यान एका नराधमाने पाठलाग करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून तिला त्याच्या राहते घरी बोलावुन घेतले. त्या नंतर त्याने त्या अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने आणि जबरदस्तीने शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले. सदर घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपीने व्हिडीओ कॉल करुन त्याचे मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि त्याच्याकडे असलेल्या पेनड्रा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर; परळी पॅटर्न तयार करणार- किरण गित्ते IAS

 डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँड शाळेचे शानदार उद्घाटन


शिक्षणानेच समृद्धी व उन्नती; परळीतील या शैक्षणिक उपक्रमांसाठी सदैव पाठिशी - ना पंकजा मुंडे

वंडरलँड मुळे परळीत अधुनिक शिक्षणाचे दालन खुले झाले - आ.धनंजय मुंडे

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर; परळी पॅटर्न तयार करणार- किरण गित्ते IAS

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –

       विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी संचलित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल (डी.डब्ल्यू.पी.एस.) वंडरलँड शाळेचे उद्घाटन शनिवारी (दि. २ मे) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे,माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास मा. श्री किरण गित्ते साहेब IAS ,माजी आमदार संजय दौंड,परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, सौ. उषाताई किरण गित्ते यांची उपस्थिती लाभली.

          डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँडनाथ रोड, परळी वैजनाथ येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी पंकजाताई मुंडे,आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी संपूर्ण शाळेची पहाणी केली. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन करुन सोहळा सुरु झाला. यावेळी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीतांने उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ .श्रीकांत पाटील यांनी केली. यावेळी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या दहावीतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बोलतांना किरण गित्ते (आयएएस) यांनी सांगितले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आठवण होणार नाही असा एकही प्रसंग आमच्या जीवनात नाही.गोपीनाथराव मुंडे यांनी १९८० साली आपल्या सहकाऱ्यांसह शेतकऱ्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकावी यासाठी न्यू इंग्लिश स्कूल काढली.या शाळेतच आम्ही शिकलो.परंतू कालांतराने ही शाळा बंद पडली तेंव्हापासून आपण शाळा काढायची हा विचार मनात होता. डि.वाय. पाटील यांच्या प्रेरणेतून विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटी स्थापन करून सौ.उषा गित्ते यांनी दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी किरण गित्ते ॲकाडमी, दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल,पोतदार जम्बो स्कूल आणि आता डिडब्ल्यूपीएस वंडरलँड ही शाळा सुरु केली.शिक्षणाचा परळी पॅटर्न या माध्यमातून निर्माण व्हावा यासाठी,गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यात येईल असे आयएएस किरण गित्ते यांनी सांगितले.

        उद्घाटन प्रसंगी बोलताना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यानी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. डी डब्ल्यू पी एस वंडरलँड यासारख्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन ते भविष्यात स्पर्धात्मक जगात सक्षमपणे उभे राहू शकतील. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे.परळीमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या अधिकाधिक शिक्षण संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. संस्कारी पिढी घडवण्याची नितांत गरज आहे.शिक्षण केंद्र प्रभावी असेल तर अर्थ कारणालाही बळ मिळते.त्यासाठी या शैक्षणिक उपक्रमांसाठी आम्ही सदैव पाठिशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

           यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण संस्था निर्माण केल्याबद्दल विवेकानंद युथ वेल्फेअर संस्थेचे त्यांनी कौतुक केलं. किरण गित्ते आणि उषा गित्ते यांनी परळी परिसरात आधुनिक शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. ही काळाची गरज आहे. डी.डब्ल्यू.पी.एस. वंडरलँड सारख्या उपक्रमांमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांप्रमाणे शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. संस्थेच्या या प्रयत्नांचे मनापासून स्वागत आहे. परळीला आभिमान वाटेल असे काम उत्तरोत्तर करुन परळीचा नावलौकिक करावा अशा शुभेच्छां आ.धनंजय मुंडे यांनी दिल्या.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी तर आभार प्रदर्शन वंडरलँड च्या प्राचार्या डाॅ. स्वप्नाली टालेयांनी केले.या कार्यक्रमास परळी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक,व्यापारी, अधिकारी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील सर, डी डब्ल्यू पी एस वंडरलैंड प्राचार्य स्वप्नाली टाले मॅडम , उमेश गायकवाड विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....