ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश

इमेज
माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढविण्यावर भर;हवामान कृती आराखड्याचा नियमित आढावा घ्या ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश मुंबई, दि. १९ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या *माझी वसुंधरा अभियान* आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात आज पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हवामान कृती आराखड्यांवर नियमित चर्चा व्हावी तसेच मंत्रिमंडळ बैठकीत दरमहा हवामान बदल विषयाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढाकार घेणार असल्याचे यावेळी श्रीमती मुंडे यांनी सांगितले. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, उपसचिव जॉय ठाकूर आदी उपस्थित होते. श्रीमती मुंडे म्हणाल्या की, माझी वसुंधरा अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. या अभियानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभाव...

आरोपी पोलिसांच्या ताब्यात ....

 केजमध्ये पुन्हा अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार !



शरीर संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार !

केज :- केज तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचाराची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला घरी बोलावून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आई, वडील भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.

केज शहरातील एका भागात राहत असलेली शालेय शिक्षण घेत असलेली १५ वर्ष १० महिने वयाच्या मुलीचा पंधरा दिवसापूर्वी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १:०० ते ३:०० वा. च्या दरम्यान एका नराधमाने पाठलाग करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून तिला त्याच्या राहते घरी बोलावुन घेतले. त्या नंतर त्याने त्या अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने आणि जबरदस्तीने शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले. सदर घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपीने व्हिडीओ कॉल करुन त्याचे मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि त्याच्याकडे असलेल्या पेनड्राईव्ह मधील बळजबरीने लैगींक अत्याचार केलेला व्हिडीओ दाखवला. तसेच आता सांगेल तसे कर. असे म्हणुन कपडे काढ म्हणाला, परंतु तिने नकार दिला असता व्हिडीओ व्हॉयरल करण्याची धमकी दिली.

त्या नंतर दि. २ मे रोजी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात रेहान रियाज शेख याच्या विरुद्ध गु. र. नं. २५८/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५, ७६, ७८(१), ७९, ६४(२) (i), ६५(१), ३५१(२) (३) आणि पोक्सोचे कलम ४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या