ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी
२९ वर्षीय तरुणाने केला मामाच्या दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार
केज :- मामा मामीला भेटण्यासाठी आलेल्या २९ वर्षाच्या भाच्याने घरी कोणी नसताना रात्रीच्या वेळी मामाच्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर मनाच्याच घरात बलात्कार केल्याची निंदनीय घटना उघडकीस आली आहे.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दि. ४ मे रोजी धाराशिव जिल्ह्यातील इटकुर ता. कळंब येथील एक २९ वर्षीय तरुण हा त्याच्या आजोळी मामा-मामीकडे आला होता. रात्रीच्या वेळी त्याचे मामा व मामी हे त्यांच्या दहा वर्ष वयाच्या चिमुकल्या मुलीला भाच्या सोबत घरी घेऊ ठेवून शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याच्या गैरफायदा घेऊन त्या नराधम भाच्याने मामाच्या दहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. आई-वडील घरी आल्या नंतर त्या चिमुकलीने घडलेल्या सर्व प्रकारची माहिती दिली.
त्या वरून त्या नराधमा विरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. १२५/२०२६ भा. न्या. सं. ६४(२), (एफ) (आय) (एम), ६५(२) आणि पोक्सोचे कलम ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत बर्डे हे तपास करीत आहेत.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या आवळल्या मुसक्या :- बलात्कारा नंतर आरोपी पळून गेला होता. त्याचा माग काढून पोलिस उपनिरीक्षक भारत बर्डे आणि त्यांचे सहकारी पोलिस कॉन्स्टेबल महेश कोकाटे आणि सोहेल पठाण यांनी आरोपीला दि. ५ मे रोजी रात्री त्याला धाराशिव जिल्ह्यातील इटकुर ता. कळंब येथून ताब्यात घेऊन अटक केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा