मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

उद्या दुपारी १ वा. निकाल.....

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर; उत्सुकता संपली



 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी  ८ मे) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी अधिकृत परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

     या परीक्षेसाठी आठ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, सात लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. राज्यातील एकूण २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून संपूर्ण राज्यातील पाच हजार १११ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल आठ दिवस लवकर जाहीर केला जाणार आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहणार?

Https://Sscresult.Mahahsscboard.In/

Https://Mahahsscboard.In/



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....