परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

 चना खरेदीस २९ मे पर्यंत मुदतवाढ, धनंजय मुंडेंची मागणी केंद्र सरकारने केली पूर्ण




मुदतवाढ मागितली १५ मे पर्यंत, शिवराज सिंह चौहान यांनी मुदतवाढ दिली २९ मे पर्यंत

मुंबई (प्रतिनिधी) - राज्यात चना (हरभरा) खरेदीस शासकीय खरेदी केंद्रावर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, तसेच पोर्टलवर याबाबत नोंद करण्यात मुदतवाढ देण्यात यावी या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीस थेट केंद्र सरकारने मान्यता दिली असून शासकीय हमीभाव चना खरेदी केंद्रांवर आता २९ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

२९ एप्रिल पर्यंत नाफेड द्वारा संचालित शासकीय केंद्रांवर चना खरेदीस शासनाने दिलेली मुदत २४ एप्रिल रोजीच ऑनलाइन नोंदी बंद करून शासनाने थांबवली होती. याबाबत उत्पादक शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सह केंद्र सरकारला लेखी पत्राद्वारे विनंती करुन शासकीय केंद्रांवर किमान १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती केली होती. 

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली असून आता चना (हरभरा) उत्पादक शेतकऱ्यांना आपला चना २९ मे पर्यंत ऑनलाइन नोंदी करून शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करता येणार आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी आ. धनंजय मुंडे यांच्या सह केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या