इमेज
  परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.           अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला...

 मोबाईल परत देण्याचा बहाण्याने वृद्ध शेतकऱ्याच्या खात्यातील १ लाखांवर डल्ला!




धारूर: हारवलेला मोबाईल परत देण्याचे नाटक करून एका ६२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या बँक खात्यातून १ लाख रुपये लांबवल्याची धक्कादायक घटना धारूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्याने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, सायबर चोरट्यांच्या या नव्या पद्धतीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

धारूर येथील कसबा विभागात राहणारे सुधीर नारायण चंद्रे हे शेती आणि पुरोहितचे काम करतात. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७.४० च्या सुमारास ते आपल्या शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना टोलनाक्याच्या पुढे त्यांचा मोबाईल रस्त्यात कोठे तरी पडला. घरी आल्यावर मोबाईल नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मुलाने त्याच नंबरवर फोन केला असता तो समोरून एका व्यक्तीने उचलला. मोबाईल धारूरच्या घाटात सापडला असून तो घेऊन जा, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर दोन २० ते २५ वयोगटातील तरुणांनी घाटामध्ये चंद्रे यांच्या मुलाला मोबाईल परत केला.

मोबाईल हातात आल्यानंतर सुधीर चंद्रे यांनी आपले बँक बॅलन्स तपासले असता, त्यांच्या 'फोन पे' अॅपद्वारे रात्री ११.४७ आणि ११.४९ च्या सुमारास अनुक्रमे ७० हजार आणि ३० हजार असे एकूण १ लाख रुपये एका अज्ञात बँक खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले. मोबाईल सापडलेल्या व्यक्तीने त्याचा गैरवापर करून हा आर्थिक डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी सुधीर नारायण चंद्रे यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस ठाण्यात संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६ आणि ३२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब किसन भवर हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....