विधानपरिषदेसाठी उमेदवारी कोणाला?
सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
केज :- केज येथील येथील सराईत गुन्हेगार जुबेर उर्फ मारी उर्फ पाप्या मुस्ताक फारोकी, वय (२९ वर्ष, रा. रोजा मोहल्ला, केज जि.बीड) याच्या विरुद्ध पोलिस प्रशासनाने संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत (एम पी डी ए ) अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
केज शहरातील जुबेर उर्फ मारी ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी याच्यावर केज येथे घरात घुसुन मारहान करणे, हितसंबंधीत व्यक्तींना मारहाण करुन जबरीने पैसे काढुन घेणे, चोरी करणे, हत्याराने वार करुन जखमी करणे, दुखापत करणे, दगड विटाने मारुन जखमी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अवैध शस्त्र बाळगणे, मोटर सायकल चोरी इत्यादी अशा गंभीर स्वरूपाच्या दहा गुन्ह्याची नोंद पोलीस अभिलेखावर आहे. त्या पैकी सहा गुन्हे हे न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून चार गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
त्यामुळे बीड जिल्ह्यातील आणि केज तालुक्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यातील गुंडगिरी, गुन्हेगारी तसेच वाळु माफीयांचे समुळ उच्चाटन करण्याचा दृष्टीकोन डोळ्या समोर ठेवुन एमपीडीए व मकोका कायद्या अंतर्गत गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचे योजिले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी केज वेंकटराम यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेवून कार्यवाही करण्याच्या सुचना केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना दिल्या होत्या. त्या आदेशा वरुन पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, हेड पोलिस हेडकॉस्टेबल बाळासाहेब अहंकारे, पोलिस हेडकॉस्टेबल त्रिंबक सोपने, कॉस्टेबल शिवाजी कागदे, पोलिस कॉन्स्टेबल संतोष गिते, पोलिस नाईक बजरंग मुंडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल संगिता हनवते यांनी जुबेर उर्फ मारी ऊर्फ पाप्या मुस्ताक फारुकी त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथे हर्सूल कारागृहात हजर करुन त्याला स्थानबध्द केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा