इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेची विद्यार्थिनी नगमा मुख्तार खान महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक पदी निवड

 डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळा परळी वै. दहावीच्या परीक्षेस घवघवीत यश उर्दू माध्यमातून तालुक्यात प्रथम.96.96%  

  


डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळेची विद्यार्थिनी नगमा मुख्तार खान महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक पदी निवड 

परळी वैजनाथ -

परळी वैजनाथ येथील डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी, जिल्हा बीड संचलित डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये 96.96 टक्के निकालासह परळी तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. उर्दू माध्यमातून विद्यालयाने हे यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

तसेच बारावी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये विज्ञान शाखेचा 98 टक्के निकाल लागला असून, विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत शेख फायजा गयास हिने 88 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम, तर शेख इशरा अनवर हिने 81 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.

बारावीतील गुणवंत विद्यार्थी

विज्ञान शाखेत सय्यदा आयेशा सिद्दीखा अश्फाक हिने प्रथम क्रमांक मिळवला असून इनामदार मरियम हसनोद्दीन शेख हिने द्वितीय क्रमांक मिळवला.तर कला शाखेत शेख अरिबा जब्बार हिने प्रथम, तर असलम हैदर खान यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

याचबरोबर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी नगमा मुख्तार खान हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करून महसूल सहाय्यक पदावर निवड मिळवत विद्यालयाचा गौरव वाढवला. तिचा शाळेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हाजी वाहाजोद्दीन मुल्ला यांनी अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापिका (प्राचार्या) पठाण मुनवरी बेगम हसन खान यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, शिक्षणप्रेमी व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या