इमेज
  परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.           अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला...

‘… तोपर्यंत राजकारण्यांनो भेटायला येऊ नका’ नसरापूर मुलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया




पुणे (Pune) जिल्हयातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Nasrapur) येथे घडलेल्या ४ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, पीडित मुलीच्या वडिलांनी एक व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे.



पीडितेच्या वडिलांची व्हिडिओद्वारे विनंती


पीडित मुलीचे वडील अस्थी विसर्जनासाठी देहू (Dehu) येथे गेले असताना त्यांनी हा व्हिडिओ संदेश जारी केला. त्यांनी म्हटले की, “जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत एकाही राजकीय नेत्याने सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी येऊ नये. जेव्हा त्या गुन्हेगाराला फाशी होईल, तेव्हाच आम्ही राजकारण्यांना भेटू.” ही आपली आणि आपल्या कुटुंबाची नम्र इच्छा असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....