पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन
ऊन्हाची तिव्रता व पाण्याची टंचाई लक्षात घेता राज्यातील शाळा विदर्भाच्या धर्तीवर
शाळा 01 जुलैपासून सुरू कराव्यात अथवा सकाळच्या सत्रात भरवाव्यात - मराठवाडा शिक्षक संघाची मागणी
परळी / प्रतिनिधी
विदर्भ वगळता राज्यातील शाळा दि.१५ जून रोजी सुरू झाल्या आहेत. विदर्भातील शाळा मात्र तेथील उन्हाची तीव्रता व पाण्याची टंचाई मुळे १ जुलै पासून सुरुवात होत आहेत.विदर्भा प्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रातील शाळा 01 जुलै पासून सुरू कराव्यात अथवा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अलनिनोच्या प्रभावाने महाराष्ट्रात अद्याप पाऊस झाला नाही. काही भागात थोड्या प्रमाणात पाऊस झाला व नंतर पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे संपूर्ण राज्यभर उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.उन्हाची तिव्रता व भीषण पाणी टंचाईला जनता तोंड देत आहे. सर्वत्र विदर्भा सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शाळेतील कुपनलिकांचे पाणी आटले आहे. शालेय पोषण शिजवण्यासाठी पाणी मिळत नाही. म्हणून चांगला पाऊस पडेपर्यंत राज्यातील सर्व शाळा विदर्भाच्या धर्तीवर 01 जुलै पासून सुरू कराव्यात अथवा सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्य शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आसल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा