परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

 धक्कादायक!  २२ अल्पवयीन मातांची नोंद; प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून एक मन सुन्न करणारी आणि सामाजिक व्यवस्थेला हादरवून टाकणारी धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या ऑनलाइन नोंदणीतून समोर आली आहे. तालुक्यात तब्बल २२ अल्पवयीन मुली गरोदर असल्याचे उघड झाले असून, यापैकी तीन माता तर अवघ्या १५ वर्षांखालील आहेत. या संवेदनशील प्रकारामुळे बालविवाह प्रतिबंधक यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


आरोग्य विभागाच्या नियमित ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या २२ मातांपैकी १६ माता प्रत्यक्षात पाटोदा तालुक्यातील असून, उर्वरित इतर तालुक्यातील असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, गटविकास अधिकारी उद्धव सानप यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य, पंचायत आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. या प्रकरणात पीडित मुलींचे वय, विवाहाची परिस्थिती आणि पुराव्यांची तपासणी करून संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक अडचणी, स्थलांतर आणि सामाजिक दबावामुळे छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे.


#ChildMarriage #SocialIssue #BeedNews #Maharashtra #ChildProtection

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या