संतवाङ्मयाचे संशोधक ॲड.दत्तात्रय महाराज यांचा सत्कार तेलगाव(प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा कीर्तनकार ह.भ.प. ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय कारी चे प्राचार्य डाॅ.तेजेस तिडके यांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार केला.यावेळी संस्थेचे सचिव डॉॅ.पांडुरंग तिडके तसेच प्रा रुपेश दुबे, प्रा सतिश पांचाळ, मोमीन अशपाक उपस्थित होते. यावेळी प्राचार्य तिडके म्हणाले की,दत्तात्रय महाराज यांचे संतवाङ्मयाचे संशोधक म्हणून केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे असून अलक्षित संत जगमित्र चरित्र आणि अभंग गाथा तसेच मराठी भाषेचा आद्य कवीचा ग्रंथ "सार्थ विवेकसिंधु" यावरील संशोधन हे अद्वितीय असून संत जगमित्र यांच्या विषयी त्यांनी संबध आयुष्य वेचले आहे असे गौरवोद्गार काढले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा