पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन

इमेज
परळी रेल्वे विकास समितीच्या धरणे आंदोलनाच्या दणक्यानंतर द म रेल्वेचे सिकंदराबाद  विभागीय व्यवस्थापकांनी परळीत घेतला आढावा पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...    शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांना भेटून  निवेदन सादर केले.       परळी रेल्वे विकास समितीच्या ०८ जून च्या धरणे आंदोलना नंतर दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांनी आज (दि.१८) सकाळी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकापासून भेट देऊन नविन रेल्वे स्थानक उभारणी,रेल्वे मार्गाची कामे, प्रशासकीय विषय,प्रवाशी सुविधा आदींबाबत परळीत आढावा घेतला. परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक ...

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या मुख्य कार्यालयाकडे अंदोलकांच्या मागणीचा पाठपुरावा केल्या जाणार ...

 क्षेत्रीय व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासना नंतर सिरसाळ्यातील बॅंक मॅनेजर विरोधातील अंदोलन स्थगित 


महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या मुख्य कार्यालयाकडे अंदोलकांच्या मागणीचा पाठपुरावा केल्या जाणार 

बॅंक कर्मचारी/अधिकारी खातेदार,नागरिकांशी समन्वयाने

वर्तन करतील  - क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद कुराडे यांची ग्वाही 


● अंदोलनास संतप्त शेकडो  खातेदार, नागरिकांचा पाठिंबा

 सिरसाळा :  महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळ्याचे मॅनेजर हे खातेदार,पत्रकार,शेतकरी यांच्याशी उद्धट वर्तन करत मग्रूरिने बोलत असल्याने या भागातील नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.त्यांची या ठिकाणाहून बदली करण्या संदर्भात सिरसाळ्यात पत्रकार मिलिंद चोपडे व त्यांचे सहकारी अदित्य मेंडके, गणेश काळे यांनी तीन दिवस महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळा समोर दिनांक १६ जून ते १८ जून पर्यंत ठिय्या अंदोलन केले .  लवकरात लवकर व्यवस्थापक संदिप रेड्डी यांची बदली ची प्रक्रिया करुन सिरसाळा महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेस सुसंवाद करणारा व खातेदारांशी समन्वयाने वर्तन करणारा मॅनेजर देण्यात यावा अशी मागणी केली.  महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.  सदरील अंदोलन अधिक व्यापक झाले. अखेर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या क्षेत्रीय अधिकारी बीड यांनी अंदोलकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन अंदोलकांची जी  मागणी आहे कि, व्यावस्थापक संदिप रेड्डी याची बदली करण्यात यावी,संदर्भात मुख्य कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल व 

बॅंक कर्मचारी/अधिकारी खातेदार,नागरिकांशी समन्वयाने वर्तन करतील अशी क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद कुराडे यांनी ग्वाही दिली. लेखी आश्वासन व वर्तना बद्दल ग्वाही दिल्याने तीन दिवस चाललेले अंदोलन स्थगित करण्यात आले आहे.  या संदर्भात सविस्तर वृत्त असे कि, पत्रकार मिलिंद चोपडे

हे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळा येथे काही कामानिमित्त गेलो होते, बॅंकेत शाखा व्यवस्थापक संदिप रेड्डी यांना या दरम्यान कर्जमाफी संदर्भात त्यांनी विचारले कि, आपल्या शाखेत किती कर्जदार शेतकरी आहेत ? किती थकीत आहेत किंवा किती शेतकरी कर्जमाफीस पात्र असे विचारले असता समाधानकारक न उत्तर देता , मग्रूरी ने म्हणाले कि सांगत नाही, मग वरिष्ठांचा संपर्क मागितला तर तोही संपर्क दिला नाही. असे मग्रूरीने का वर्तन करत आहेत असे विचारले असता त्यांनी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, पोलीसांना बोलावतो म्हणाले आणि तुम्ही बॅंकेत कुणाची परवानगी घेऊन आलात ? बॅंकेत यायला परवानगी लागते असे बेकायदेशीर वक्तव्य करून बाहेर जा म्हणाले. एवढे उद्धट गैरवर्तन त्यांनी पत्रकार मिलिंद चोपडे यांच्या शी करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली . याच बरोबर बॅंकेत यायला परवानगी लागते, परवानगी शिवाय बॅंकेत येता येत नाही असे बेकायदेशीर वक्तव्य त्यांनी केले आहे.  

    म्हणून या बाबीवरुन महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळा समोर दिनांक १६ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून अंदोलन सुरु करण्यात आले होते.खातेदार नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या मॅनेजर संदिप रेड्डी यांची येथून तात्काळ बदली करून सिरसाळा शाखेत सुसंस्कृत मराठी भाषक मॅनेजर नियुक्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.  संदर्भात वरिष्ठ कार्यालयास आमच्या मागण्या पाठवून लवकरात लवकर बदली ची प्रक्रिया करुन सिरसाळा महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेस सुसंवाद करणारा व खातेदारांशी समन्वयाने वर्तन करणारा मॅनेजर देण्यात यावा.  अशी मागणी अंदोलकांनी केली आहे.

● अंदोलन दरम्यान शेकडो नागरिकांनी भेट देऊन मॅनेजर संदिप रेड्डी याच्या वर्तना बद्दल संताप व्यक्त करुन अंदोलनास समर्थन दिले आहे.मॅनेजर संदिप रेड्डी यांनी अनेक खातेदार नागरिकांशी गैरवर्तन केले आहे. असे संतप्त नागरिक व्यक्त झाले.

● अंदोलनाची प्रमुख कारणे   :

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळा चे व्यवस्थापक/मॅनेजर संदिप रेड्डी हा शेतकरी व खातेदार यांच्याशी उद्धट वागतो/बोलतो, मग्रूर वर्तन, कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारले खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी, परवानगी शिवाय बॅंकेत येऊ नका म्हणतो,परवानगी घ्यायची कुणाची  ? बॅंक खाजगी किंवा मॅनेजर च्या वैयक्तिक मालकीची आहे का ? ,मॅनेजर/व्यावस्थापक संदिप रेड्डी हे हिंदी भाषिक आहेत ते हिंदीतूनच बोलतात त्या मुळे इथल्या बहुतांश मराठी भाषिकांना हिंदी समजत नाही ,मराठी भाषिक व्यावस्थापक नियुक्त करणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या