इमेज
आ. धनंजय मुंडे यांचे स्पष्ट निर्देश ; श्रावणापूर्वी परळीतील ८४ खोल्यांचे भक्तनिवास होणार सुरू ! भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा कंत्राटदाराला सोबत घेत सर्व संबंधितानी घेतला आढावा परळी वैजनाथ | प्रतिनिधी       बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे सुसज्ज भक्तनिवास आगामी श्रावण महिन्यापूर्वी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणांनी भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा आढावा घेत नियोजन निश्चित केले आहे.        परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत माजी मंत्री धनंजय मुंडे व ना. पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाला होता. या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, विविध कारणांमुळे पोलीस स्टेशनजवळ उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे भक्तनिवास  अपूर्ण अवस्थेत पडून आहे.या पार्श्वभूमीवर ही बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबं...

इंदपवाडीच्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा!

 जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊनच अनेक अधिकारी झाले!- नागरगोजे यांचे प्रतिपादन

 इंदपवाडीच्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा!

परळी (प्रतिनिधी) 

उत्कृष्ट भविष्याची वाटचाल विद्यार्थ्यांनी करावी यासाठी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच प्रवेश द्यावा असे आवाहन तालुक्याच्या कृषी अधिकारी प्रा डॉ अर्चना नागरगोजे यांनी उपस्थित पालकांना केले. 

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते. इयत्ता पहिलीला प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करणे, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करणे, त्यांच्या पावलांची ठसे घेऊन ती कायमस्वरूपी जतन करणे त्याचबरोबर शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशाचे वाटप करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होता. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाची तयारी उत्तम प्रकारे करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी फुग्यांची कमान उभारण्यात आली होती. इयत्ता सहावी -सातवीच्या विद्यार्थिनींनी सुंदर रांगोळी काढून परिसराची सजावट केली होती. 

तालुक्याच्या कृषी अधिकारी प्रा डॉ अर्चना नागरगोजे यांच्यासह, सहाय्यक कृषी अधिकारी सौ हाडबे वाय एन, गावच्या सरपंच सौ शालुबाई फुलचंदराव मुंडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष केशवराव मुंडे, माजी सरपंच श्री फुलचंदराव मुंडे, शालेय शिक्षण समिती सदस्य श्री वैजनाथ मुंडे, शिक्षण प्रेमी नागरिक रामकृष्ण मुंडे यांच्यासह पालकांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिक्षक वृंदांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा डॉ अर्चना नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान मिळवण्याच्या खडतर मार्गाचा अवलंब करण्याचे सूचित केले त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान घेऊन पारंगत व्हा, मोठे अधिकारी व्हा असा सल्ला दिला. मध्यान भोजनामध्ये दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देण्यात आले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुभाष केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वश्री जे के चौधरी, चंद्रप्रकाश लोखंडे, विष्णू ढाकणे, चंद्रशेखर फुटके, दीपक खंदारे आणि श्रीमती संध्या नागरगोजे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या