आ. धनंजय मुंडे यांचे स्पष्ट निर्देश ; श्रावणापूर्वी परळीतील ८४ खोल्यांचे भक्तनिवास होणार सुरू !

भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा कंत्राटदाराला सोबत घेत सर्व संबंधितानी घेतला आढावा

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

      बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे सुसज्ज भक्तनिवास आगामी श्रावण महिन्यापूर्वी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणांनी भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा आढावा घेत नियोजन निश्चित केले आहे.

       परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत माजी मंत्री धनंजय मुंडे व ना. पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाला होता. या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, विविध कारणांमुळे पोलीस स्टेशनजवळ उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे भक्तनिवास  अपूर्ण अवस्थेत पडून आहे.या पार्श्वभूमीवर ही बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंत्राटदाराला उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून भक्तनिवास वैद्यनाथ देवस्थान समितीच्या ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या. याअनुषंगाने माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी, वैद्यनाथ देवस्थान समितीचे विश्वस्त राजेश  देशमुख, गटनेते वैजनाथ सोळंके, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेचे कंत्राटदार जे. के. कन्स्ट्रक्शनचे संचालक जाफर खान यांनी संयुक्तपणे भक्तनिवासाची पाहणी केली. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी भक्तनिवास देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक नियोजन यावेळी निश्चित करण्यात आले. कंत्राटदार जाफर खान यांनीही उर्वरित सर्व कामे श्रावणापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. भक्तनिवास सुरू झाल्यानंतर परळी येथे दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांना व भाविकांना अत्यंत माफक दरात निवासाची सुविधा उपलब्ध होणार असून तीर्थक्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे भाविकांची गैरसोय दूर होऊन धार्मिक पर्यटनालाही मोठी मदत होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या