परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात

इमेज
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी करावे – दीपाताई मुधोळ-मुंडे शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून प्रसारमाध्यमे कार्य करतात – पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे दैनिक न्याय टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाच्या पुणे समाजकल्याण आयुक्त सौ. दीपाताई मुधोळ-मुंडे (IAS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते भास्कर चाटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, काँग्रेस नेते वसंत मुंडे, तसेच दैनिक न्याय टाइम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक बालकिशन सोनी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव ...

थारचा थरार: प्रशांत देशमुख या युवकाला चिरडले -  उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करा सकल मराठा समाजाची मागणी





परळी वैजनाथ प्रतिनिधी :

परळी शहरातील गजबजलेल्या आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या थार चारचाकी वाहनाने पार्सल सेवा देणारे युवक प्रशांत प्रल्हादराव देशमुख यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.


घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ जखमी अवस्थेतील प्रशांत देशमुख यांना उपचारासाठी परळी येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे परळी शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ज्या भागात अनेक शासकीय कार्यालये, निवासी वसाहती आणि बंगल्यांची वस्ती आहे, त्या भागात भरधाव वेगाने वाहन चालविण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित थार वाहनचालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

"एका निष्पाप युवकाचा जीव घेणाऱ्या बेदरकार वाहनचालकावर कठोर कारवाई व्हावी," अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या