परळीत दैनिक न्याय टाइम्सचा वर्धापन दिन उत्साहात
विधानपरिषद निवडणूकीत महायुतीची सरशी ; ना. पंकजाताई मुंडे यांनी केले नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन
बीड मधून विजयी झालेल्या बस्वराज पाटील यांना दिल्या शुभेच्छा
मुंबई दि. २२ --- स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत भाजपा महायुतीची सरशी झाली असून १७ पैकी १६ जागांवर महायुतीने घवघवीत यश संपादन केले आहे. आजच्या मतमोजणीनंतर विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचे राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या अकरा जागांची मतमोजणी आज झाली, यात दहा जागांवर भाजपा महायुतीचे आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, एकूण १७ जागांपैकी यापूर्वी महायुतीच्या ६ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या, त्यामुळे आजच्या मतमोजणीनंतर महायुतीचे १६ आमदार विजयी झाले असून विरोधी आघाडीला एकही जागा मिळाली नाही.
*ना.पंकजाताईंनी बस्वराज पाटील यांचेसह नवनिर्वाचित आमदारांचे केले अभिनंदन*
------
बीड-धाराशिव-लातूर मतदारसंघातून निवडून आलेले बस्वराज पाटील यांच्यासह मराठवाड्यातील अमर राजूरकर, सईदखान, सुहास सिरसाठ तसेच नंदकिशोर महाजन, राजेंद्र राऊत, राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, प्रवीण पोटे, धैर्यशील कदम या सर्व आमदारांचे ना. पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा