दुर्दैवी घटना....कुटुंबाचा आधार गेला !
पेरणीसाठी अर्थिक विवंचनेतील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
केज :- प्रतिनिधी...
पेरणीसाठी पैसे नसल्याने हताश झालेल्या एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली आहे.
केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या कोरडेवाडी येथील तरुण शेतकरी बाबू सुभाष यादव वय (२६ वर्ष) या शेतकऱ्याच्या नावावर २ हेक्टर २० आर जमीन आहे. मागील आठवड्या पासून पाऊस पडू लागल्याने शेतकरी पेरणी करू लागले आहेत. बाबू यादव यांनी जवळ असलेल्या पैशातून थोडी फार पेरणी केली. मात्र पूर्ण शेताची पेरणी करण्यासाठी त्याच्या जवळ पैसे नसल्याने ते हताश झाले होते. पेरणी वेळेवर न झाल्यास शेती पडीक राहील, या विचाराने आलेल्या नैराश्यातून बाबू यादव यांनी टोकाची भूमिका घेऊन १ जुलै रोजी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या घटनेची माहिती मिळताच जमादार पुरुषोत्तम शेप, पोलीस नाईक गोरख फड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या घटनेची केज पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. मयत शेतकरी बाबू यादव यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा