MB NEWS-पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला

 पंकजाताई ,भुजबळ शिंगणे आदी नेते पोहचले धनंजय मुंडेंच्या भेटीला



मुंबई, प्रतिनिधी.....

    आपले भाऊ मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.

    सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचबरोबर *खा. सौ. सुप्रियाताई सुळे, युवक नेते पार्थ दादा पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली व बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

  धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला भाजप नेत्या पंकजा मुंडे भेटीला पोहचल्या आहेत.त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे,महापौर किशोर पेडणेकर आदी भेट घेण्यासाठी रूग्णालयात आले आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !