पोस्ट्स

जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार

इमेज
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६: प्रसादगुरु कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी)     भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या आयोजना संदर्भात आज व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत जन्मोत्सव सोहळ्याची नवीन कार्यकारिणी सर्वांमध्ये निवडण्यात आली यामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव 2026 च् अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.      भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून, यामध्ये उत्सवाच्या रूपरेषेसह नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते यावर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती  प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष: . विठोबा चाटूफळे, सचिव: .अविनाश नवाडे कोषाध्यक्ष: . प्...
इमेज
  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर अंबाजोगाई : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई हे कार्यालय आता स्वतःच्या मालकीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे.  लातूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत, स्व. विमलताई मुंदडा आरोग्य संकुल, सेंजारी, मौजे लोखंडी सावरगाव येथे बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालयीन इमारतीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे सर्व कामकाज दि. 06 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), परवाने, कर भरणा तसेच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी नागरिकांनी यापुढे लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयात उपस्थित राहून आपली कामे करून घ्यावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई यांनी केले आहे. नवीन कार्यालयीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून कामकाज अधिक सुलभ व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पुढील सर्व कामकाजासाठी लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयाचा उपयोग करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली....

इमेज
  दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता कपाळावर ठसठशीत कुंकु, अंगावर ग्रामीण वेशभूषेतलं लुगडं, कष्टाने रापलेलं शरीर अशी तिची वेशभूषा. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती गावातली साधी बाई वाटते पण ती कोणी साधीसुधी बाई नव्हती तर . आपल्या तिन्ही मुलांपैकी दोन मुलांना शिकून कलेक्टर आयुक्त वगैरे वगैरे प्रशासनातील सर्वोच्च पदावर बसवणारी पावरफुल माता होती.  एका ऊसतोड कामगाराच्या घरात जन्म झालेल्या आणि तशीच पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना (ताडसोनना) या छोट्याशा गावातून एक अशी प्रेरणादायी कहाणी आहे, जी प्रत्येक आईच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. ही कहाणी आहे आसराबाई मुंढे या साध्या शेतकरी मातेची होती. नुकतच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झाले.  आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे tukaram mundhe आणि अशोक मुंढे ashok mundhe यांच्या त्या मातोश्री होत्या आसराबाई मुंढे यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत, शेती करत आणि अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व शिकवले. घरची परिस्थिती मर्यादित असली तरी त्यांनी कधीही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही. त्यांचा एकच व...

मोठी कारवाई.....

इमेज
  अंबाजोगाई शहरालगतच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांसह ४.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत अंबाजोगाई :- शहराच्या लगत असलेल्या अंबा सहकारी साखर कारखाना रोडवर  जान्हवी हॉटेल येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळत असलेले सहा जुगारी व रोख रक्कम व  त्यांच्याकडील ४,७३,६७०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या टीमने हस्तगत केला आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार दि ०२ रोजी  जान्हवी हॉटेल कारखाना रोड अंबाजेगाई परिसरात काही ईसम हे पत्यावर पैसे लावुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळत आहेत व खेळवित आहेत या गोपनिय अशा माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीस निरिक्षक शरद जोगदंड  यांच्या आदेशान्वये  त्या ठिकाणी जावुन छापा मारला असता त्या ठिकाणी गोलाकार पध्दतीमध्ये ०६ ईसम नामे मोहम्मद खतीब वय ५० वर्षे, रा. खतिब गल्ली अंबाजोगाई , सद्दाम बागवान वय ३० वर्षे रा. बागवान गल्ली अंबाजेगाई, शेख अजहर जिलानी वय ४८ वर्षे रा. खतिबगल्ली अंबाजोगाई, श्रीराम बारगजे वय ३९ वर्...

चोरीला गेलेले मिनी गंठण पोलिसांनी केले जप्त

इमेज
  बस स्टँडवरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोराणारी महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात केज :- मुलीला भेटायला लातूरला जात असलेल्या एका महिलेचा गळ्यातील मिनी गंठण केज येथील बस स्टँडवरून चोरीला गेले होते. त्यातील संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. दि. १९ मार्च रोजी दुपारी केज शहरातील मंजुश्री जगदाळे या लातूर येथील शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर थांबलेल्या असताना अज्ञात महिला चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडून घेऊन फरार झाली होती.  या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं . १६९/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार दाखल झालेला आहे.  या प्रकरणी पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजेस तपासून त्या गंठण चोराचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक अनोळखी महिला मंजुश्री जगदाळे यांच्या माठीमागे उभी असल्याचे दिसत होती. तसेच ती बसमध्ये न चढता नंतर तेथून निघून घेतल्याचे आढळू...

परळीतील सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याची झाली होती फसवणूक..

इमेज
  बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; “डिजिटल अरेस्ट” फसवणूक प्रकरणातील तीन आरोपी अटकेत परळी वैजनाथ,वृत्तसेवा:          सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी बीड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तब्बल 23 लाख 42 हजार 888 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.     सायबर पोलीस ठाणे, बीड येथे दाखल गुन्ह्यानुसार परळी वैजनाथ येथील तक्रारदार सूर्यकांत निवृत्ती मुंडे यांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून ऑनलाइन माध्यमातून मोठी रक्कम उकळण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासा दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख रुपये रोख जप्त केले असून, आणखी 3.20 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले आहेत. आरोपी फसवणुकीतून मिळालेली रक्कम ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.        सायबर पोल...

प्रासंगिक लेख: डॉ.सिद्धार्थ तायडे

इमेज
 ' बहिष्कृत भारत' – समतेच्या क्रांतीचा बुलंद आवाज २ एप्रिल १९२७ हा दिवस भारताच्या पत्रकारितेच्या आणि सामाजिक चळवळीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. याच दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बहिष्कृत भारत' या पाक्षिकाचे पहिले पाऊल टाकले. 'मूकनायक' नंतर सुरू झालेले हे वृत्तपत्र केवळ कागदाचा तुकडा नव्हते, तर ते शोषितांच्या संघर्षाचे अस्त्र आणि अन्यायाविरुद्ध पेटलेली मशाल होती. 'बहिष्कृत भारत'ची निर्मिती एका विशिष्ट ऐतिहासिक कालखंडात झाली. जेव्हा अस्पृश्य समाजावर अमानवीय बंधने होती आणि मुख्य प्रवाहातील माध्यमे या वर्गाच्या प्रश्नांवर मौन बाळगून होती, तेव्हा बाबासाहेबांनी या 'मूक' समाजाला बोलके करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी हे विचारपीठ निर्माण केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सनातनी विचारसरणीवर कठोर प्रहार केले. त्यांचे अग्रलेख हे केवळ वैचारिक नव्हते, तर ते पुराव्यांसह केलेले तार्किक विश्लेषण असे. 'बहिष्कृत भारत'च्या शीर्षकाखाली त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग छापला होता: "आता तरी पुढे हा...
इमेज
कौडगाव साबळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; वेदमूर्ती श्री व सौ.समाधान कुलकर्णी यांच्या हस्ते झाली आरती परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....       कौडगाव साबळा तालुका परळी वैजनाथ येथे गेल्या 26 मार्च पासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. या निमित्ताने कौडगाव साबळा येथील रहिवासी व पुणे येथील वेदमूर्ती समाधान कुलकर्णी यांनी सपत्नीक ग्रंथ पूजन व आरती केली.       कौडगाव साबळा येथे ह. भ. प. प्रशांत महाराज डोंगरे यांची सुमधुर श्रीमद् भागवत कथा झाली. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा या सप्ताहात झाली. परंपरेनुसार कौडगाव साबळा येथील या वार्षिक सप्ताहात अंकित रामराव कुलकर्णी व समाधान लक्ष्मण कुलकर्णी यांची बुधवारी महापंगत झाली.  त्याचप्रमाणे सौ. समृद्धी समाधान कुलकर्णी व समाधान कुलकर्णी यांच्या शुभहस्ते श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त,गावकरी उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!