इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे. नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्...

परळीतील सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याची झाली होती फसवणूक..

 बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; “डिजिटल अरेस्ट” फसवणूक प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

परळी वैजनाथ,वृत्तसेवा:

         सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी बीड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तब्बल 23 लाख 42 हजार 888 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.


    सायबर पोलीस ठाणे, बीड येथे दाखल गुन्ह्यानुसार परळी वैजनाथ येथील तक्रारदार सूर्यकांत निवृत्ती मुंडे यांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून ऑनलाइन माध्यमातून मोठी रक्कम उकळण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासा दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख रुपये रोख जप्त केले असून, आणखी 3.20 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले आहेत. आरोपी फसवणुकीतून मिळालेली रक्कम ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

       सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढत जळगाव येथून त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रसन्न अजय कासट (वय 31),स्वाती प्रसन्न कासट (वय 26), संकेत दीपक बेलदार (वय 22) यांचा समावेश आहे.या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत का, तसेच इतर किती नागरिकांची फसवणूक झाली आहे, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “डिजिटल अरेस्ट”सारख्या खोट्या धमक्यांना बळी पडू नये. पोलीस कधीही व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाहीत. अशा प्रकारचे कॉल आल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. ही कारवाई पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या