कौडगाव साबळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; वेदमूर्ती श्री व सौ.समाधान कुलकर्णी यांच्या हस्ते झाली आरती



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....

      कौडगाव साबळा तालुका परळी वैजनाथ येथे गेल्या 26 मार्च पासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. या निमित्ताने कौडगाव साबळा येथील रहिवासी व पुणे येथील वेदमूर्ती समाधान कुलकर्णी यांनी सपत्नीक ग्रंथ पूजन व आरती केली.

      कौडगाव साबळा येथे ह. भ. प. प्रशांत महाराज डोंगरे यांची सुमधुर श्रीमद् भागवत कथा झाली. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा या सप्ताहात झाली. परंपरेनुसार कौडगाव साबळा येथील या वार्षिक सप्ताहात अंकित रामराव कुलकर्णी व समाधान लक्ष्मण कुलकर्णी यांची बुधवारी महापंगत झाली.  त्याचप्रमाणे सौ. समृद्धी समाधान कुलकर्णी व समाधान कुलकर्णी यांच्या शुभहस्ते श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त,गावकरी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!