इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे. नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्...

चोरीला गेलेले मिनी गंठण पोलिसांनी केले जप्त

 बस स्टँडवरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोराणारी महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात






केज :- मुलीला भेटायला लातूरला जात असलेल्या एका महिलेचा गळ्यातील मिनी गंठण केज येथील बस स्टँडवरून चोरीला गेले होते. त्यातील संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.


दि. १९ मार्च रोजी दुपारी केज शहरातील मंजुश्री जगदाळे या लातूर येथील शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर थांबलेल्या असताना अज्ञात महिला चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडून घेऊन फरार झाली होती. 

या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं . १६९/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार दाखल झालेला आहे. 

या प्रकरणी पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजेस तपासून त्या गंठण चोराचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक अनोळखी महिला मंजुश्री जगदाळे यांच्या माठीमागे उभी असल्याचे दिसत होती. तसेच ती बसमध्ये न चढता नंतर तेथून निघून घेतल्याचे आढळून आले होते.

दरम्यान, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथकाने घटनास्थळाला भेट दिली. बस स्टँड परिसरातील सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसत असलेल्या माहिती वरुन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय पद्धतीने माहिती काढली. त्या माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार महेश जोगदंड, पोलिस हवालदार जफर पठाण, पोलिस हवालदार दिलीप गित्ते, महिला पोलिस हवालदार स्वाती मुंडे, वाहन चालक गणेश मराडे यांनी संशयित महिलेला बीड येथील माऊली नगर भागातून ताब्यात घेतले. तिने केज येथून चोरलेले मिनी गंठण देखील तिच्या ताब्यातून हस्तगत करून तिला केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

_______________________


ताब्यात घेतलेली महिला सराईत चोर  :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून ताब्यात घेतलेली महिला ही सराईत चोर असून तिच्या विरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. ती पोलिसांच्या ताब्यात आल्याने तिच्या कडून आणखी काही गुन्ह्याची उकल होऊन मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या