इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देत पक्षाने बाबा शेख यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बीडचे खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे आणि शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केज येथील पवनसुत निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन बाबा शेख यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी पक्षकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची शहर व तालुक्यात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विस्तार सुरू असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष अधिक जोमाने जनसंपर्क वाढविणार आहे. नियुक्तीनंतर बाबा शेख यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटना बळकट करण्...

मोठी कारवाई.....

 अंबाजोगाई शहरालगतच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांसह ४.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत




अंबाजोगाई :- शहराच्या लगत असलेल्या अंबा सहकारी साखर कारखाना रोडवर  जान्हवी हॉटेल येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळत असलेले सहा जुगारी व रोख रक्कम व  त्यांच्याकडील ४,७३,६७०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या टीमने हस्तगत केला आहे. 

       याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार दि ०२ रोजी  जान्हवी हॉटेल कारखाना रोड अंबाजेगाई परिसरात काही ईसम हे पत्यावर पैसे लावुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळत आहेत व खेळवित आहेत या गोपनिय अशा माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीस निरिक्षक शरद जोगदंड  यांच्या आदेशान्वये  त्या ठिकाणी जावुन छापा मारला असता त्या ठिकाणी गोलाकार पध्दतीमध्ये ०६ ईसम नामे मोहम्मद खतीब वय ५० वर्षे, रा. खतिब गल्ली अंबाजोगाई , सद्दाम बागवान वय ३० वर्षे रा. बागवान गल्ली अंबाजेगाई, शेख अजहर जिलानी वय ४८ वर्षे रा. खतिबगल्ली अंबाजोगाई, श्रीराम बारगजे वय ३९ वर्षे रा रायगडनगर, अंबाजोगाई, नागनाथ ढगे वय २२ वर्षे रा. रायगडनगर, अंबाजोगाई , धर्मराज वाघमारे वय ३९ वर्षे रा. मोरेवाडी, अंबाजोगाई असे तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळतांना व खेळवित असताना मिळुन आले. त्यांचे ताब्यातुन तिर्रट जुगाराचे नगदी ११,६७०/- रुपये मोबाईल फोन किमंत १,३७,०००/- रुपये व मोटारसायकल किमंत ३,२५,०००/ रुपये असा एकुन ४,७३,६७०/- रुपायाचा मुद्देमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सदरची कार्यवाही हि नवनित काँवत, पोलीस अधिक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, ऋषीकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधिक्षक, उपविभाग अंबाजोगाई, यांचे मार्गदर्शनाखाली शरद जोंगदंड, पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर, पोउपनि अनंद शिंदे, पोलीस अमंलदार पांडुरंग काळे, हनुमंत चादर, प्रविणकुमार गित्ते, सुशांत गायकवाड, भागवत नागरगोजे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार विजयसिंग गायकवाड हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या