पोस्ट्स

भावपूर्ण श्रद्धांजली........!!!!

इमेज
गोविंद (भैय्या)चांडक यांना आजीशोक; फुलाबाई काकाणी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      येथील सर्वपरिचित व्यावसायिक गोविंद (भैय्या) चांडक यांच्या आजी श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांचे दि.६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.      श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, संयमी व धीरोदात्त स्वभावाच्या होत्या. वयाची शंभरी पार करत त्यांनी जीवनभरात लेक, नातू, नातसूना पणतू अशा पारिवारिक नात्यांना भरभरून माया दिली. चांडक परिवारासाठी एक आधारवड अशी कौटुंबीक भूमिका त्यांनी अगदी लीलया पार पाडत एक आदर्श निर्माण केला. वयोमानापरत्वे त्यांनी शतकी आयुष्यात इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन नातू, तीन नाती,नातसूना, पतवंडे असा मोठा परिवार आहे.श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांच्या निधनाने चांडक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

विनोद सामत अभिष्टचिंतन >>>>> ✍️ प्रा.डॉ. विनोद जगतकर

इमेज
  विनोद सामत.... एक अजातशत्रू व्यक्तिमत्व दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून श्रीयुत विनोद सामत यांची ओळख आहे. परळी शहराच्या राजकारणातील अशोक सामत हे एक महत्त्वपूर्ण नाव. मुंडे व सामत या दोन परिवारातील दोन पिढ्यांचे हे नाते संपूर्ण परळीच्या पंचक्रोशी मध्ये सर्वश्रुत आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांकडे वैद्यनाथ बँक आल्यानंतर तिला नावारूपास आणण्याचे काम श्री अशोक सामत यांनी केले. परळी नगरीचे नगराध्यक्ष म्हणूनही अशोकसेठ यांची कारकीर्द सुप्रसिद्ध आहे. या सामत परिवाराच्या राजकारणाचा वारसा घेऊन आज  विनोद सामत समर्थपणे वाटचाल करत आहेत. आज नामदार पंकजाताई व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत असलेली वैद्यनाथ बँक यशो शिखरावर नेण्यासाठी विनोद सामत अथक परिश्रम करताना दिसतात. बँकिंग क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अत्यंत व्यापक व विस्तृत स्वरूपाचे आहे. बँकिंग क्षेत्रातील अत्यंत क्लिष्ट असणाऱ्या संकल्पना ते अतिशय सोप्या भाषेत आम्हाला नव...
इमेज
  नांदेड विभागाची तिकीट तपासणीत विक्रमी कामगिरी; ₹14.95 कोटी महसूल  परभणी (प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये तिकीट तपासणी मोहिमेद्वारे आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत ₹14.95 कोटी महसूल जमा केला आहे. मुख्यालयाने दिलेल्या ₹14.80 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळवत विभागाने हे लक्ष्य आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन दिवस आधीच, म्हणजे 28 मार्च 2026 रोजी पूर्ण केले.       मागील आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये नोंदवलेल्या ₹12.59 कोटी महसुलाच्या तुलनेत यंदा लक्षणीय वाढ झाली असून, तिकीट तपासणी कार्यक्षमता अधिक बळकट झाल्याचे दिसून येते. विशेष तिकीट तपासणी मोहिमा, सातत्यपूर्ण देखरेख आणि काटेकोर नियोजन यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.      यंदाच्या वर्षात विभागाने काही महत्त्वाचे विक्रमही प्रस्थापित केले आहेत. 17 ऑक्टोबर 2025 रोजी एका दिवसात सर्वाधिक ₹10.90 लाख महसूल मिळविण्यात आला, तर ऑक्टोबर 2025 महिन्यात ₹1.55 कोटींची सर्वोत्तम मासिक कामगिरी नोंदवण्यात आली.      विनातिकीट व अनियमित प्रवासावर प्र...

जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार

इमेज
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६: प्रसादगुरु कुलकर्णी यांची अध्यक्षपदी निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी)     भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या आयोजना संदर्भात आज व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत जन्मोत्सव सोहळ्याची नवीन कार्यकारिणी सर्वांमध्ये निवडण्यात आली यामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव 2026 च् अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.      भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली असून, यामध्ये उत्सवाच्या रूपरेषेसह नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते यावर्षीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गोरक्षक वेदमूर्ती  प्रसाद गुरु कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष: . विठोबा चाटूफळे, सचिव: .अविनाश नवाडे कोषाध्यक्ष: . प्...

खरात प्रकरणात सामाजिक संघटनां आणि महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे - संजय बनसोडे

इमेज
बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील  कार्यक्रम राबविणार  - माधव बावगे खरात प्रकरणात सामाजिक संघटनां आणि महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे - संजय बनसोडे  परळी / प्रतिनिधी .....       सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने धर्माच्या नावावर धर्माच्या नावावर सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना कसे फसविले जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.त्यामुळे बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील कार्यक्रम राबविणार  असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे अध्यक्ष माधव बावगे यांनी केले.तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे यासाठी प्रशिक्षण शिबीरावर भर देण्यात येईल. तसेच खरात प्रकरणात महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व महिलांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे  असे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी सांगितले.        परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज दिनांक 5 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे यांना नुकताच बाबा आमटे राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार मिळाला.त्याबदद...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

इमेज
तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त शिखरचे ३० वे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे देहावसान नांदेड :  तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय 95 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता माहूर गडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भक्तांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सन 1978 पासून ते आजतागायत देवस्थानचे महंत म्हणून गादीवर विराजमान होते. तब्बल 4 तप (48 वर्षे) त्यांनी या गादीवर राहून तप:साधनेत व्यतित केले. ते वैकुंठवासी झाल्याने असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. दिवंगत महंत अच्युत भारती महाराज यांच्यानंतर १९७८ मध्ये विधिवत प्रक्रियेनुसार महंत मधुसूदनजी भारती महाराज हे श्री दत्तशिखर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले होते. तब्बल ४ तप म्हणजे ४८वर्षे त्यांनी गादीवर राहून तप:साधनेत जीवन व्यतीत केले.महंतजींच्या जीवनशैलीत साधेपणा व परंपरेचे काटेकोर पालन दिसून येत असे. त्यांनी कधीही वाहनाचा वापर केला नाही. मेणा सव...

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन....

इमेज
परळीत सोमवारी 'सद्भावना ईद मिलन संमेलन'चे आयोजन; राष्ट्रीय एकात्मतेचा जागर होणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):          जातीय सलोखा, प्रेम बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, परळी येथे 'सद्भावना ईद मिलन संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. 'जमाअत ए इस्लामी हिंद'च्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा येत्या सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे.          हे संमेलन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील 'विशेष अतिथी शासकीय विश्रामगृह' येथे संध्याकाळी ६:३० वाजता पार पडेल. नैतिकतेच्या आधारावर सर्व धर्मीय बांधवांना एकत्र आणून सामाजिक सलोखा वाढवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी विचार मंच (महाराष्ट्र) चे संस्थापक अध्यक्ष शामसुंदर सोन्नर महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच, सद्भावना मंच महाराष्ट्राचे सचिव डॉ. रफिक पारनेरकर  हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या स्नेहसंमेलनास शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मित्रपरिवारासह मोठ्या संख्...

अभिष्टचिंतन लेख>>>>>

इमेज
  सोमेश्वर साथीतुन जनतेसी नाती जोडणारे : संपादक बालासाहेब फड       आज आपली घरं मुकी व्हायला लागली आहेत.घरात पूर्वीसारखा संवाद उरलेला नाही.बाप एका दरवाजावाटे घरात आला तर मुलगा दुसऱ्या दरवाजावाटे बाहेर जातो.घराची धर्मशाळा झाली आहे,घराचे रेस्ट हाऊस झाले आहे,घराची वेटींग रूम झाली आहे.माणसांचे नाते आता फेसबुक व व्हाट्सअप वरूनच जोपासल्या जात आहेत म्हणून एक कवी असे म्हणतो की   विज्ञानाच्या यूगात  केवढी मोठी चूक l   आता रक्तांच्या ही नात्यांना लागते फेसबुक ll   नात्यात कृत्रिमता वाढत चालली असून अशा काळात नाते संबंध सांभाळने,जोपासने हे मोठे जिकीरीचे काम बनले आहे.अस्या ही काळात आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून जनतेसी नाते जोडता येऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सोमेश्वर साथी  हे वृतपत्राचे संपादक बालासाहेब फड होत.जे या वृत्तपत्राच्या माध्यमातून नाती जोडण्याचे व जपण्याचे प्रामाणिक काम करत आहेत.अस्या या नात्यांनी श्रीमंत असलेल्या संपादक बालासाहेब फड यांचा  आज 04 एप्रिल हा जन्मदिवस.त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा संक्षिप्त आढ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!