विनोद सामत अभिष्टचिंतन >>>>> ✍️ प्रा.डॉ. विनोद जगतकर
विनोद सामत.... एक अजातशत्रू व्यक्तिमत्व
दि वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून श्रीयुत विनोद सामत यांची ओळख आहे. परळी शहराच्या राजकारणातील अशोक सामत हे एक महत्त्वपूर्ण नाव. मुंडे व सामत या दोन परिवारातील दोन पिढ्यांचे हे नाते संपूर्ण परळीच्या पंचक्रोशी मध्ये सर्वश्रुत आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांकडे वैद्यनाथ बँक आल्यानंतर तिला नावारूपास आणण्याचे काम श्री अशोक सामत यांनी केले. परळी नगरीचे नगराध्यक्ष म्हणूनही अशोकसेठ यांची कारकीर्द सुप्रसिद्ध आहे. या सामत परिवाराच्या राजकारणाचा वारसा घेऊन आज विनोद सामत समर्थपणे वाटचाल करत आहेत. आज नामदार पंकजाताई व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत असलेली वैद्यनाथ बँक यशो शिखरावर नेण्यासाठी विनोद सामत अथक परिश्रम करताना दिसतात. बँकिंग क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अत्यंत व्यापक व विस्तृत स्वरूपाचे आहे. बँकिंग क्षेत्रातील अत्यंत क्लिष्ट असणाऱ्या संकल्पना ते अतिशय सोप्या भाषेत आम्हाला नवीन संचालकांना समजावून सांगतात. उद्योग, बांधकाम, रियल इस्टेट, बँकिंग, वाणिज्य व व्यापार या क्षेत्रातील त्यांचा ज्ञानाचा आवाका आश्चर्यचकित करणारा आहे. राजकारणापेक्षा ही त्यांचा या क्षेत्रातील वावर अधिक दिसून येतो. पंकजाताईंनी त्यांची केलेली निवड किती सुयोग्य आहे, हे त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येते. आमचे नेते महाराष्ट्राचे राज्याचे माजी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या बद्दलही त्यांच्या मनामध्ये कमालीचा आदर दिसून येतो. एक कुटुंब वत्सल पिता, एका सुप्रसिद्ध वित्तीय संस्थेचे अभ्यासू चेअरमन, मित्रांच्या विनोदाला खळाळून हसून दाद देणारे एक दिलदार मित्र, भारतीय जनता पार्टी या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असे अनेक पैलू विनोदसेठ यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये दिसून येतात. आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना भरभरून मनःपूर्वक शुभेच्छा...
✍️ प्रा.डॉ. विनोद जगतकर
संचालक वैद्यनाथ को.ऑप.बँक,लि.परळी वैजनाथ.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा