मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ

इमेज
  बांधकामावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू बीड प्रतिनिधी —        मोहा ता. परळी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल विलास माने (वय २८, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात  बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस हवालदार विष्णु नामदेव शेंडगे अधिक तपास करत आहेत .     याबाबत मयताची आई निर्मला विलास माने यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंत्राटदार मुस्ताक कादरी व कामगार अक्षय गायकवाड आणि शेख अजीन हे त्यांच्या घरी आले. त्यांनी अमोल हा मोहा येथील बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नंतर नाते...

खरात प्रकरणात सामाजिक संघटनां आणि महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे - संजय बनसोडे

बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील  कार्यक्रम राबविणार  - माधव बावगे




खरात प्रकरणात सामाजिक संघटनां आणि महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे - संजय बनसोडे 

परळी / प्रतिनिधी .....

      सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने धर्माच्या नावावर धर्माच्या नावावर सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना कसे फसविले जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.त्यामुळे बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील कार्यक्रम राबविणार  असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे अध्यक्ष माधव बावगे यांनी केले.तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे यासाठी प्रशिक्षण शिबीरावर भर देण्यात येईल. तसेच खरात प्रकरणात महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व महिलांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे  असे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी सांगितले.

       परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज दिनांक 5 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे यांना नुकताच बाबा आमटे राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार मिळाला.त्याबददल परळी शाखेच्या वतीने त्यांचा व प्रथमच परळी दौऱ्यावर आलेले राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, सुधाकर तट, राज्य सहकार्यवाह (व्यसन प्रबोधन व संघर्ष) महाराष्ट्र अंनिस,सूर्यकांत तेलंग,कार्याध्यक्ष,अंबाजोगाई ,महाराष्ट्र अंनिस,बालाजी राऊत,जिल्हा प्रधान सचिव,धाराशिव,महाराष्ट्र अंनिस आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी माधव बावगे व संजय बनसोडे यांनी उपस्थित अंनिस पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.आगामी कार्यक्रमांची माहिती दिली.याप्रसंगी रानब गायकवाड,प्रा. विलास रोडे, सुकेशनी नाईकवाडे, नवनाथ दाने, विकास वाघमारे, अशोक मुंडे, अनंत इंगळे, संजीब राॅय, संजय खाकरे, जी.एस. सौदळे, बालाजी ढगे, विठ्ठलराव झिलमेवाड, भानुदास उफडे,रतन उजगरे, सुरेश जाधव, अभिमन्यू घोबाळे, राहुल सूर्यवंशी, महादेव आजले, भिमराव गोदाम, प्रकाशसिंग तुसाम यांच्या सह अदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या