भावपूर्ण श्रद्धांजली........!!!!

गोविंद (भैय्या)चांडक यांना आजीशोक; फुलाबाई काकाणी यांचे निधन




परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     येथील सर्वपरिचित व्यावसायिक गोविंद (भैय्या) चांडक यांच्या आजी श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांचे दि.६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

     श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, संयमी व धीरोदात्त स्वभावाच्या होत्या. वयाची शंभरी पार करत त्यांनी जीवनभरात लेक, नातू, नातसूना पणतू अशा पारिवारिक नात्यांना भरभरून माया दिली. चांडक परिवारासाठी एक आधारवड अशी कौटुंबीक भूमिका त्यांनी अगदी लीलया पार पाडत एक आदर्श निर्माण केला. वयोमानापरत्वे त्यांनी शतकी आयुष्यात इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन नातू, तीन नाती,नातसूना, पतवंडे असा मोठा परिवार आहे.श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांच्या निधनाने चांडक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार