पोस्ट्स

ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

क्रीडाविषयक प्रोत्साहन.....

इमेज
  अंबाजोगाई क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोहम गजाकोशचा दबदबा डॉ.अतुल शिंदे यांच्या हस्ते सोहमला आरसीबी खेळाडू देवदत्त पड्डिक्कल यांच्या सहीचा बॉल प्रदान अंबाजोगाई : (प्रतिनिधी)अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट टूर्नामेंटमध्ये युवा गोलंदाज सोहम गजाकोश याने आपल्या अचूक आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत विशेष छाप पाडली. स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत सोहमने तब्बल 13 फलंदाजांना बाद केले आणि “बेस्ट बॉलर” किताबावर आपले नाव कोरले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे मैदानावर उपस्थित क्रिकेटप्रेमींनी त्याचे जोरदार कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेत सोहमने टाकलेल्या माऱ्यासमोर अनेक फलंदाज निष्प्रभ ठरले. योग्य टप्प्यावर गोलंदाजी, उत्कृष्ट लाईन-लेंथ आणि दबावाच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता यामुळे तो स्पर्धेतील सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी “बेस्ट बॉलर” पारितोषिक देण्याची घोषणा सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ् डॉ. अतुल शिंदे यांनी केली होती. स्पर्धेच्...
इमेज
अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या पर्समधील सोन्याचे साडेचार लाखांचे दागिने लंपास अंबाजोगाई (प्रतिनिधी):-    सध्या उन्हाळी सुट्यांमुळे अंबाजोगाई बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे . बसस्थानकावरील याच प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतील ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी वैजनाथ येथील रहिवासी मनिषा विनोद जगतकर (वय ५०) या बुधवारी सकाळी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुरुड (जि. लातूर) येथे जाण्यास निघाल्या होत्या. त्या परळीहून अंबाजोगाई बस स्थानकावर आल्या होत्या.  येथून पुढे जाण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई येथून मुरुड  जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे  जागा पकडण्यासाठी त्यांचे दीर आप्पाराव कांबळे यांनी दागिन्यांची बॅग कंडक्टरच्या सीटजवळ...

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणार

इमेज
  मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेची घोषणा महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणार नवी दिल्ली,१४: भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष संक्षिप्त पुनरीक्षण - तिसरा टप्पा' (SIR Phase-III) राबवण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत महाराष्ट्राचा प्रामुख्याने समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख ६४ हजार ४१३ मतदारांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार आहेत. चालू असलेल्या जनगणनेच्या 'हाऊस लिस्टिंग' प्रक्रियेचा विचार करून आयोगाने हे वेळापत्रक आखले असून, हवामानाची प्रतिकूलता लक्षात घेता केवळ हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांना या टप्प्यातून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्रातील या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण ९७,९२४ बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांच्या ९६,९४९ बूथ लेव्हल एजंट्सची (BLA) मदत घेतली जाणार आहे. आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २० जून ते २९ जून २०२६ या काळात अधिकार...
इमेज
छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य: नगर परिषदेकडून परळीत मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा प्रदान ; आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जागा हस्तांतरित ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळी वैजनाथ शहरात मराठा भवन उभे राहावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून ची सकल मराठा समाजाची  मागणी होती. ना.पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदे कडून मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा देण्यात आली आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत आज माजी मंत्री आ .धनंजय मुंडे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करत ही जागा मराठा भवनसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे.         वैद्यनाथ मंदिर परिसरात नंदागौळ रस्त्यावर वेताळ मंदिराच्या बाजूला असलेली 28 गुंठे जागा नगरपरिषदेकडून मराठा भवनसाठी नियोजित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून परळी मध्ये मराठा भवन असावे अशी मराठा समाजाची आग्रही मागणी होती. आता मराठा भवनसाठी ही जागा हस्तांतरित करण्यात आली आहे.लवकरात लवकर सुसज्ज मराठा भवन उभे राहील अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी व्य...
इमेज
परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे अनोखे 'आपट्याचं सोनं' आंदोलन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "एक वर्ष सोनं खरेदी करू नका" असे जाहीर केल्याच्या निषेधार्थ, परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक आगळेवेगळे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. "आपट्याचं सोनं, आमचा स्वाभिमान!" अशी घोषणा देत पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवार, दि. १४ मे रोजी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्र येत हे आंदोलन केले. आंदोलकांनी मोदी सरकारच्या आवाहनाचा निषेध करण्यासाठी एकमेकांना आपट्याची पाने (प्रतीकात्मक सोनं) देऊन आपला रोष व्यक्त केला. आमची संस्कृती, स्वाभिमान आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे आपट्याचे सोनं देऊन शेतकरी आणि कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. "आपल्याच सोनं देऊ, आंदोलनाला हातभार लावू" असे आवाहन करत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प...
इमेज
  माजी आमदार अँड.विजय गव्हाणे यांची ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती परभणी  ता.14 माजी आमदार श्री. विजय गव्हाणे यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या  ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.  या पत्रात महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे  नमूद करून पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी  सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी  प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.श्री. विजय गव्हाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या