माजी आमदार अँड.विजय गव्हाणे यांची ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती

परभणी  ता.14

माजी आमदार श्री. विजय गव्हाणे यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या  ‘महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे. 

या पत्रात महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे  नमूद करून पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी  सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी  प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.श्री. विजय गव्हाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार