नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे अनोखे 'आपट्याचं सोनं' आंदोलन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "एक वर्ष सोनं खरेदी करू नका" असे जाहीर केल्याच्या निषेधार्थ, परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक आगळेवेगळे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. "आपट्याचं सोनं, आमचा स्वाभिमान!" अशी घोषणा देत पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवार, दि. १४ मे रोजी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्र येत हे आंदोलन केले.

आंदोलकांनी मोदी सरकारच्या आवाहनाचा निषेध करण्यासाठी एकमेकांना आपट्याची पाने (प्रतीकात्मक सोनं) देऊन आपला रोष व्यक्त केला. आमची संस्कृती, स्वाभिमान आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे आपट्याचे सोनं देऊन शेतकरी आणि कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. "आपल्याच सोनं देऊ, आंदोलनाला हातभार लावू" असे आवाहन करत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

पंतप्रधानांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. यावेळी नगरसेवक कादर पाशा कुरेशी, गटनेते नितीन भैय्या बागवाले, तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, जेष्ठ नेते उत्तम दादा माने,ऍडओकेट जीवनराव देशमुख युवक शहराध्यक्ष सय्यद फेरोज़ भाई वैजनाथ जोशी अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या