नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य: नगर परिषदेकडून परळीत मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा प्रदान ; आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जागा हस्तांतरित !



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      परळी वैजनाथ शहरात मराठा भवन उभे राहावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून ची सकल मराठा समाजाची  मागणी होती. ना.पंकजाताई मुंडे व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगरपरिषदे कडून मराठा भवनसाठी 28 गुंठे जागा देण्यात आली आहे. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत आज माजी मंत्री आ .धनंजय मुंडे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करत ही जागा मराठा भवनसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे.

        वैद्यनाथ मंदिर परिसरात नंदागौळ रस्त्यावर वेताळ मंदिराच्या बाजूला असलेली 28 गुंठे जागा नगरपरिषदेकडून मराठा भवनसाठी नियोजित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून परळी मध्ये मराठा भवन असावे अशी मराठा समाजाची आग्रही मागणी होती. आता मराठा भवनसाठी ही जागा हस्तांतरित करण्यात आली आहे.लवकरात लवकर सुसज्ज मराठा भवन उभे राहील अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली. या अनुषंगाने आज संबंधित ही 28 गुंठे जागा माजी मंत्री आ .धनंजय मुंडे यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. यावेळी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व नियोजित मराठा भवनच्या नाम फलकाचे अनावरण आ.धनंजय मुंडे, नगराध्यक्ष सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, न. प. गटनेते वैजनाथ सोळंके, नगरसेवक व्यंकटेश शिंदे, श्रीकृष्ण कराड, नितीन बागवाले, अनंत इंगळे, प्रा.शंकर कापसे, देवराव लुगडे, नितीन शिंदे, सेवकराम जाधव, उत्तम माने, उत्तम मोरे, इंजि. संजय देशमुख, राजेश ठोंबरे शिवाजी देशमुख, बाबा शिंदे, महादेव गंगणे, दिलीप माने, वैजनाथ सुरवसे, सचिन मराठे,प्रल्हाद सुरवसे, शरद चव्हाण, गिरीश भोसले, डॉक्टर प्रा.पी.एल.कराड, राजेंद्र सोनी, रमेश चौंडे, विजयकुमार खोसे ,न. प. उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नगर अभियंता ढवळे आदींसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परळीत देखणे मराठा भवन उभे राहील असा विश्वास मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला. मराठा भवनसाठी ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार धनंजय मुंडे व नगराध्यक्ष सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने परळी नगर परिषदेचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

मराठा भवन मध्ये काय आहे प्रस्तावित?....

    दरम्यान,सकल मराठा समाजाच्या वतीने परळी येथे उभारण्यात येणाऱ्या मराठा भवन मध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुला मुलींचे वसतीगृह, शिकवणी क्लासेस, अभ्यासिका, नोकरी मार्गदर्शन केंद्र आदी विद्यार्थी कलागुण विकसित करण्यासाठीचे उपक्रम या भवन मधून राबवण्यात येणार आहेत. उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसायातील बारकावे, येणारी आव्हाने, उद्योजक, व्यावसायिकांचे परिचय मेळावे आदी आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह कार्य, शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक, सामाजिक ,व्यावसायिक यासह अनेक विषयावर प्रबोधन मार्गदर्शन मिळावे आयोजित करण्यासाठी मराठा भवन उपयुक्त ठरणार आहे. सर्व गुणसंपन्न पिढी घडविण्याच्या दृष्टिकोनातून ही वास्तू एक महत्त्वाचे केंद्र ठरणार असल्याचा संकल्प मराठा भवनच्या उभारणीत करण्यात आलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या