क्रीडाविषयक प्रोत्साहन.....

इमेज
  अंबाजोगाई क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोहम गजाकोशचा दबदबा डॉ.अतुल शिंदे यांच्या हस्ते सोहमला आरसीबी खेळाडू देवदत्त पड्डिक्कल यांच्या सहीचा बॉल प्रदान अंबाजोगाई : (प्रतिनिधी)अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट टूर्नामेंटमध्ये युवा गोलंदाज सोहम गजाकोश याने आपल्या अचूक आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत विशेष छाप पाडली. स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत सोहमने तब्बल 13 फलंदाजांना बाद केले आणि “बेस्ट बॉलर” किताबावर आपले नाव कोरले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे मैदानावर उपस्थित क्रिकेटप्रेमींनी त्याचे जोरदार कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेत सोहमने टाकलेल्या माऱ्यासमोर अनेक फलंदाज निष्प्रभ ठरले. योग्य टप्प्यावर गोलंदाजी, उत्कृष्ट लाईन-लेंथ आणि दबावाच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता यामुळे तो स्पर्धेतील सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी “बेस्ट बॉलर” पारितोषिक देण्याची घोषणा सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ् डॉ. अतुल शिंदे यांनी केली होती. स्पर्धेच्...

अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या पर्समधील सोन्याचे साडेचार लाखांचे दागिने लंपास



अंबाजोगाई (प्रतिनिधी):-   सध्या उन्हाळी सुट्यांमुळे अंबाजोगाई बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे . बसस्थानकावरील याच प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतील ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी वैजनाथ येथील रहिवासी मनिषा विनोद जगतकर (वय ५०) या बुधवारी सकाळी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुरुड (जि. लातूर) येथे जाण्यास निघाल्या होत्या. त्या परळीहून अंबाजोगाई बस स्थानकावर आल्या होत्या.  येथून पुढे जाण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई येथून मुरुड  जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे  जागा पकडण्यासाठी त्यांचे दीर आप्पाराव कांबळे यांनी दागिन्यांची बॅग कंडक्टरच्या सीटजवळ ठेवली होती.  याच वेळी बसमध्ये उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने 'तुम्हाला बसता येत नाही, मी ही बॅग उचलून वर ठेवतो' असे म्हणत मदतीचा बहाणा केला. बॅग वर ठेवल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला दुसरी गाडी लागली आहे असे सांगून आपल्या दोन साथीदारांसह बसमधून खाली उतरून गेला. मनिषा जगतकर जेव्हा मुरुड येथील आपल्या माहेरी पोहोचल्या, तेव्हा त्यांना बॅगेचा आतील कप्पा कशाने तरी कापलेला आढळला. त्यातून सोन्याचे गंठण, लॉकेट, अंगठ्या, बोरमाळ, बांगड्या, कर्णफुले आणि १० हजार रुपये रोख असा एकूण ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले. 

           या घटनेनंतर मनिषा जगतकर यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन  दागिने चोरीची तक्रार नोंदवली.  दरम्यान पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद  शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या