पोस्ट्स

शिवभक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.धनंजय मुंडे यांचे आभार!!!!!

इमेज
  श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांची मान्यता आज संपन्न झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्य सरकारने दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत अधिकृतपणे हे जाहीर केले आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.  विशेष म्हणजे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार हयात असताना धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करून नियोजन विभागामार्फत राबवण्याची मागणी केली होती, त्या मागणीसही शिखर समितीने मंजुरी दिली असून, आता श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा नियोजन विभागाकडून राबवण्यात येणार आहे.  या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या व आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विविध...
इमेज
  दुचाकी कार अपघातात  एक ठार, एक जखमी  गेवराई :प्रतिनिधी... राजपिंपरी येथील दोघेजण गेवराई येथे कपडे खरेदी करून गावाकडे जात असताना छोटा हत्ती ( रिक्षा ) ने कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेला एक जण  खाली पडले. त्यावेळी समोरुन आलेल्या कारने त्याला चिरडल्याने यात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शहरा जवळील जमादारणीच्या फुलाजवळ रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या  सुमारास घडली.     भुषण भागवत पानखडे  वय १५ वर्ष असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे नावं तो आत्ताच नववीची परीक्षा पास होऊन दहावीच्या वर्गात गेला होता. तर सोबत असलेला चुलत भाऊ गणेश विठ्ठल पानखडे असे जखमीचे नाव  असून दोघे राहणार राजपिंपरी.ते दोघे रविवार रोजी दुपारी ३ वाजण्याच्या  सुमारास  गेवराई येथे कपडे खरेदी करून‌ राजपिंपरी कडे जात असताना शहरा जवळी जमादारणीच्या फुलाजवळ बाजूला असलेल्या छोटा हत्ती (  रिक्षा ) ने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला भूषण वानखडे खाली पडला. त्यावेळी समोरुन येणारी कार  त्यांच्या अंगावरून गेल्याने यात  याचा जागीच मृ...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन..

इमेज
  नेकनूर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाची हाक माजी सैनिकाला मारहाण, अत्याचाराच्या घटनांविरोधात संतप्त नागरिक एकवटणार नेकनूर (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील निगूर परिसरात घडलेल्या विविध घटनांच्या निषेधार्थ रविवार, दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजता “हिंदू जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेकनूर (निनगूर) (शेळी बाजार) येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माजी सैनिकाला झालेली मारहाण, अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, जबरदस्ती धर्मांतराचे प्रयत्न तसेच निगूर (नेकनूर) परिसरातील कथित हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. “आता किती दिवस सहन करायचे?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मोर्चामध्ये वाढती गुंडशाही, जमीन अतिक्रमण, गोहत्या, लोकसंख्येचे असंतुलन तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागण्या मांडल्या जाणार असल्याचे पोस्टरमधून स्पष्ट करण्यात आले आहे. या मोर्चात महाराष्ट्र राज्याचे आमदार महेश (दादा) लांडगे आणि संग्राम (भैय्या) जगताप यांची प्रमुख ...
इमेज
नागापूर-टोकवाडी रस्त्यावर भिषण आपघात; तरुण आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू परळी वैजनाथ, प्रतिनिधी......      परळीपासुन काही अंतरावर टोकवाडी- नागापूर रस्त्यावर  अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार एका तरुण आरोग्य कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१७) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास  घडली आहे.        टोकवाडी ते नागापूर  रस्त्यावर झालेल्या एका भीषण  अपघातात संतोष गणपतराव गुट्टे वय ४४  (ह. मु. शक्तीकुंज वसाहत,परळीवैजनाथ) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मयत संतोष गुट्टे हे  आरोग्य विभागात कुष्ठरोगतज्ञ म्हणून कार्यरत होते.  तर कन्हेरवाडी हे त्यांचे आजोळ आणि सासर होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा पश्चात आई ,वडील ,दोन बहीणी ,पत्नी,दोन मूलं असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुट्टे हे नागापूर येथे काम आटोपून मोटरसायकल वरून थर्मल कॉलनीकडे परतत होते. दरम्यान, नागापूर-टोकवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झा...

संत जगमित्रनागा मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

इमेज
  नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव भैया धर्माधिकारी दांपत्याच्या शुभ हस्ते पूजन करून अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – येथील संत जगमित्र नागा मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचा शुभारंभ परळीच्या लोकप्रिय नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व श्री. बाजीरावभैया धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते ग्रंथपूजन करून करण्यात आला. या सप्ताहात राममहाराज, विश्वनाथ महाराजघोडके,सचिन महाराज गित्ते, संजयमहाराज तांबडे,कृष्णामहाराज गुट्टे, प्रा. श्याममहाराज नेरकर तसेच पुजेचे कीर्तन ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे तर काल्याचे कीर्तन ह. भ. प. संदीपान महाराज हसेगावकर या़ंचे होणार आहे.अनेक मान्यवरांची कीर्तने होणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी यांचा सत्कार सौ. निर्गुणताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माजी नगराध्यक्ष श्री. बाजीरावभैया धर्माधिकारी यांचा सत्कार श्री. शिवरत्न मुंडे यांनी केला. यावेळी ह.भ.प. ज्ञानोबा माऊली रूमनेकर, ह.भ.प. प्रा. श्याम महाराज नेरकर, श्री. वसंतराव गीत्ते, श्री. रघुनाथ बोले,...
इमेज
वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनि मंदिरात श्री.शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा  परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)           येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनिवारी (ता.१६) शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळन करत उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहा बरोबरच विविध सामाजिक, रक्तदान शिबीर, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.                   येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिरात अनादी काळापासून दरवर्षी श्री.शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेल्या ४६ वर्षांपासून श्री शनैश्वर जन्मोत्सवानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळ्याचे आयोजन  करण्यात येत आहे. यावर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवार (दि.१०) ते शनिवार (दि.१७) आठ दिवस किर्तन, भजन, परमरस्य पारायण, रक्तदान शिबीर, विद्यार्थी गुणगौरव, अखंड शिवनाम सप्ताहाचे...
इमेज
श्रीमती रूक्मीनीबाई शेटे यांचे निधन  परळी-वैजनाथ...        येथील स्नेह नगर परिसरातील रहिवासी श्रीमती रूक्मीनीबाई दिगांबरअप्पा शेटे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.      त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, दोन विवाहित लेकी, नातवंडे, पतवंडे असा भरगच्च परिवार आहे. त्या वैद्यनाथ गॅस एजन्सीचे व्यवस्थापक श्री. भीमाशंकर अप्पा शेटे यांच्या मातोश्री होत.

ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या