पोस्ट्स

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

इमेज
माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजो...

कुणीही प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये - धनंजय मुंडेंचे आवाहन

इमेज
परळीतील मयत तौहीद खान यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल - धनंजय मुंडे कुणीही प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये - धनंजय मुंडेंचे आवाहन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी शहरातील रहिवासी, आमचा तरुण भाऊ तौहीद खान  याच्या दुर्दैवी व निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून याविषयी आपण सातत्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो; तोहिदच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल व खान कुटुंबीयांना न्याय मिळेल यादृष्टीने पुढील तपास व चार्जशीट दाखल करण्याबाबत पुढेही मी पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे म्हटले आहे.  वैद्यकीय कारणास्तव आपण मागील चार-पाच दिवस बाहेर असल्याने याबाबत व्यक्त होत आले नाही असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले असून, परळीत हिंदू-मुस्लीम सर्व समाज बांधव एकोप्याने मागील अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. आमचा हा एकोपा बाधित होऊ शकत नाही त्यामुळे कृपया कोणीही या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे केले आहे.  दरम्यान मयत तौह...
इमेज
पोलिसांची मोठी कारवाई; पावणेआठ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने परळी वेस परिसरात ३ जून २०२६ रोजी एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल ३ लाख ४० हजार २० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ४ लाख ५० हजार रुपयांचे चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ९० हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई येथील मोरेवाडी परिसरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारा २५ वर्षीय आरोपी शशिकांत शिवाजी बुलबुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अंबाजोगाई शहर पोलिसांना परळी वेस परिसरातून प्रतिबंधित मालाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचला. संशयास्पद वाटणारे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच-४४-बी-२५२९ थांबवून त्याची झडती घेतली असता, त्यात विमल पान मसाला, विडी-१ तंबाखू, प्रीमियम गोवा १००० मसाला, प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला, प्रीमियम ...

महावितरण जागे होणार की नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणार?

इमेज
  महावितरणचा बेशिस्त कारभार; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच! रात्रभर वीज गायब; उकाडा, डास आणि अंधारात नागरिकांचा अक्षरशः छळ परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरात अवघे चार-पाच पावसाचे थेंब पडताच वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचा भोंगळ, ढिसाळ आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वीज गुल झाल्यानंतर संपूर्ण रात्र नागरिकांनी उकाडा, डासांचा त्रास आणि असह्य घुसमटीत काढली. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका बाजूला प्रचंड उष्णता आणि दुसऱ्या बाजूला डासांचा वाढता त्रास यामुळे लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींची अक्षरशः परवड झाली. वीज नसल्याने पंखे, कुलर आणि इतर आवश्यक साधने बंद पडली. रात्रभर झोप न लागल्याने नागरिक हैराण झाले. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकांचे फोन उचलले गेले नाहीत. नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे लोकांमध्ये...

चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

इमेज
  महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड! चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरात अवघे चार-पाच पावसाचे थेंब पडताच महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आधीच उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांवर उकाड्यात रात्र काढण्याची वेळ आली. विशेष म्हणजे अद्याप पावसाळ्याची खरी सुरुवातही झालेली नाही. केवळ किरकोळ पाऊस पडताच वीजपुरवठा खंडित होत असेल, तर मुसळधार पावसाच्या काळात परिस्थिती किती बिकट होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांची देखभाल, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे महावितरणकडून दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात चार-पाच थेंब पावसातच वीज गायब होत असल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे. कागदोपत्री तयारी आणि प्रत्यक्षातील निष्क्रियता यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. वीज खंडित झाल्यामुळे लहान मु...

नंदागौळ गावावर शोककळा..... परळी परिसरात हळहळ

इमेज
पुण्यात घरगुती गॅसचा भीषण स्फोट; नंदागौळ येथील तिघांचा मृत्यू, बालिकेसह दोघे जखमी नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एकाच कुटुंबातील पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.       पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात खांदवेनगर, खराडी येथे वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यात एका बालिकेसह दोघी जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे नंदागौळ गावावर शोककळा पसरली आहे तर गीते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी प्राप्त झालेली माहिती अशी की, नंदागौळ येथील रहिवासी व सध्या पुणे येथे खराडी परिसरात वास्तव्यास असलेले विष्णू मुंजाजी गित्ते यांच्या पुण्यातील घरी आज ता.5 जून रोजी सकाळी 9.30 वाजण्याचे सुमारास घरातील स्वयंपाकांच्या गॅसची अचानक गळती होऊन मोठा स्फोट झाला. स्फोटात पांडुरंग विष्णू गित्ते (वय-35 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू मुंजाजी गित्ते (वय-62 वर्ष), त्यांची पत्...
इमेज
परळी सकल मातंग समाजाच्या वतीने अ.ब.क.ड आरक्षण उपवर्गीकरणासाठी तहसिल कार्यलय समोर धरणे आंदोलन व निदर्शने  परळी/ प्रतिनिधी  सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे अ ब क ड उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी परळी तहसील कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक ३ जून २०२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.   दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी दविंदर सिंग पंजाब सरकार या खटल्यात सुप्रीम कोर्टाच्या सात बेंचच्या पीठाने ६:१ असा निर्णय देऊन अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली असून. हरियाणा, हिमाचल प्रदेश ,कर्नाटक, पंजाब , तेलंगणा सह पाच राज्यांनी उप वर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे .महाराष्ट्रात 14 ऑक्टोबर 2025 रोजी यासंदर्भात न्यायमूर्ती बद्दर यांची समिती नेमली असून समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप उपवर्गीकरणाचा निर्णय होत नसल्याने परळी तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने आज दिनांक 3 जून 2026 रोजी तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात...

शेतकरी व कष्टकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी वैद्यनाथा चरणी केली प्रार्थना

इमेज
  कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन शेतकरी व कष्टकऱ्यांच्या  सुख-समृद्धीसाठी वैद्यनाथा चरणी केली प्रार्थना परळी वैजनाथ | प्रतिनिधी... अधिकमासाच्या पवित्र पावन पर्वाचे औचित्य साधत कळंब नगरीच्या नगराध्यक्षा तथा शिवसेना (शिंदे गट) नेत्या सौ. सुनंदाताई शिवाजीआप्पा कापसे यांनी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे भेट देऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजा-अर्चना करून राज्यातील जनतेच्या आरोग्य, सुख-समृद्धी तसेच शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. सौ. सुनंदाताई कापसे यांनी कळंब शहरातील सुमारे ५१ महिला भक्तांसमवेत वैद्यनाथ धाम यात्रा पूर्ण केली.    याबाबत अधिक माहिती असते, सध्याला पुरुषोत्तम मासाचे पावन सर्व सुरू आहे. भारतीय धार्मिक पुरुषोत्तम मासास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे औचित्य साधत अधिकमासाच्या धार्मिक वातावरणात कळंबच्या प्रथम नागरिक सौ. सुनंदा शिवाजीआप्पा कापसे यांनी महिला माता-भगिनींसह भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट