पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

इमेज
माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजो...

कुणीही प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये - धनंजय मुंडेंचे आवाहन

परळीतील मयत तौहीद खान यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल - धनंजय मुंडे

कुणीही प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नये - धनंजय मुंडेंचे आवाहन

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी शहरातील रहिवासी, आमचा तरुण भाऊ तौहीद खान  याच्या दुर्दैवी व निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून याविषयी आपण सातत्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो; तोहिदच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल व खान कुटुंबीयांना न्याय मिळेल यादृष्टीने पुढील तपास व चार्जशीट दाखल करण्याबाबत पुढेही मी पाठपुरावा करणार असल्याचे माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे म्हटले आहे. 

वैद्यकीय कारणास्तव आपण मागील चार-पाच दिवस बाहेर असल्याने याबाबत व्यक्त होत आले नाही असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले असून, परळीत हिंदू-मुस्लीम सर्व समाज बांधव एकोप्याने मागील अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. आमचा हा एकोपा बाधित होऊ शकत नाही त्यामुळे कृपया कोणीही या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे केले आहे. 

दरम्यान मयत तौहीद खान यांस श्रद्धांजली अर्पण करत धनंजय मुंडे यांनी परळीत आल्यानंतर खान कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या