नंदागौळ गावावर शोककळा..... परळी परिसरात हळहळ

पुण्यात घरगुती गॅसचा भीषण स्फोट; नंदागौळ येथील तिघांचा मृत्यू, बालिकेसह दोघे जखमी




नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एकाच कुटुंबातील पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.
      पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात खांदवेनगर, खराडी येथे वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यात एका बालिकेसह दोघी जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे नंदागौळ गावावर शोककळा पसरली आहे तर गीते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेली माहिती अशी की, नंदागौळ येथील रहिवासी व सध्या पुणे येथे खराडी परिसरात वास्तव्यास असलेले विष्णू मुंजाजी गित्ते यांच्या पुण्यातील घरी आज ता.5 जून रोजी सकाळी 9.30 वाजण्याचे सुमारास घरातील स्वयंपाकांच्या गॅसची अचानक गळती होऊन मोठा स्फोट झाला.
स्फोटात पांडुरंग विष्णू गित्ते (वय-35 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विष्णू मुंजाजी गित्ते (वय-62 वर्ष), त्यांची पत्नी सौ. वृंदावणी विष्णु गित्ते (वय-58 वर्षे) यांना गंभीर जखमी अवस्थेत पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यू झाला. या स्फोटात कु. नहारिका गित्ते (वय-5 वर्षे), सौ. राजश्री पांडुरंग गित्ते (वय-25 वर्षे) जखमी झाल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
नंदागौळ गावावर शोककळा
पुण्यात घरगुती गॅसचा स्फोट होऊन नंदागवळ येथील एकाच कुटुंबाती विष्णू मुंजाजी गित्ते, सौ. वृंदावणी विष्णु गित्ते, पांडुरंग विष्णु गित्ते या तिघांचे निधन झाल्याची घटना समजतात नंदागौळ गावावर शोककळा पसरली. गिते कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दिवसभर गावामध्ये या एकाच घटनेची चर्चा ऐकावयास मिळत होती.
शनिवारी नंदागौळ येथे अंत्यसंस्कार
     घरगुती गॅसच्या स्फोटामध्ये पुणे येथे निधन झालेल्या नंदागौळ येथील एकाच कुटुंबातील तिघांच्या पार्थिवावर उद्या शनिवार दिनांक 6 जून रोजी सकाळी नंदागौळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार