पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही !

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

         पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजोबांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना ७ जुलै २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत बेलांबा परिसरात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी दि.५ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ७८, ३५१(२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या