कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

MB NEWS:कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी करावी ―प्रा विजय मुंडे

 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी करावी ―प्रा विजय मुंडे




परळी/प्रतिनिधी


परळी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परळी येथे आपली कापूस खरेदीची ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केले आहे.


   

  यावर्षी कापूस या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी केल्यावर  भारतीय कपास  लि  व  राज्य पणन महासंघ द्वारे हमीभावाने शेतकऱ्यांचा  कापूस खरेदी केला जातो त्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आपली ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.


   ऑनलाईन नोंदणीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कागदपत्रे ऑनलाईन करावीत त्यामध्ये कापूस विक्री नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे   कागदपत्रे आहेत  त्यात (1)सातबारा (२)पिक पेरा (3)एक फोटो (4)आधार कार्डची झेरॉक्स व (5) राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जमा करावीत व आपल्या कापसाची नोंदणी करून घ्यावी असे आवाहन प्रा. विजय मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या