इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे -दोन महिन्यांत अतिक्रमणांवर कारवाईचे आश्वासन


 तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी  उपोषण मागे

  

-दोन महिन्यांत अतिक्रमणांवर कारवाईचे आश्वासन 


सिरसाळा न्यूज  : 

         ग्रामसेवक यांची बदली करा व रेणुकादेवी मंदिर परिसरातील गट नं 343 मधील अतिक्रमण पाडण्याच्या मागणीसाठी युवकांनी सोमवारी सुरु केलेले उपोषण तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

         सोमवारी युवकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसेवकाची बदली करावी व गट न.343 मधील अतिक्रमण पाडावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.उपोषणाचा पहिल्याच दिवशी ग्रामविकास अधिकारी यांचे बदली आदेश प्रशासनाने काढले.तर दुसऱ्या मागणीच्या पुर्ततेसाठी उपोषणावर ठाम राहिलेल्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी  स्वतः तहसीलदार यांनी येत 15 नोव्हेम्बर 2020 पर्यंत कारवाईची करण्यासाठी मुदतीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याचे मिलिंद चोपडे,धर्मा मेंडके,केशव बनसोडे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या