दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:माजी उपमुख्यमंत्री स्व सुंदरराव सोळंके जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 माजी उपमुख्यमंत्री स्व सुंदरराव सोळंके जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न




दिंद्रुड, प्रतिनिधी..


महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व उपमुख्यमंत्री तथा धारुर तालुक्यातील मोहखेड चे भुमीपुत्र स्व.सुंदररावजी सोळंके यांच्या जयंती निमित्त मोहखेड ग्रामस्थांनी वृक्षारोपणाचे आयोजन गुरुवारी सकाळी मोहखेड येथे केले होते.


महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा मोहखेड चे भुमीपुत्र स्व सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या जयंतीच्या औचित्याने मोहखेड करांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा वसा जोपासत स्तुत्य उपक्रम राबविला.मोहखेड व परिसरात शेकडो रोपट्यांची लागवड याप्रसंगी करण्यात आली. युवानेते विरेन सोळंके, धारुर कृ.उ.बा.समिती चे माजी सभापती रविंद्र सोळंके व हिंगणीचे माजी सरपंच नंदकुमार सोळंके,सरपंच शिवराज सोळंके, बालासाहेब सोळंके,बब्रुवान सोळंके, संतोष सोळंके सह मोहखेड येथील जेष्ठ मंडळी, तरुणांनी या कार्यक्रमात उपस्थिती देत वृक्षाची लागवड करत हातभार लावला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी चा तंतोतंत नियम पाळत वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....