MB NEWS:परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला !
परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी तालुक्यातील लघुतलावांपैकी एक व परळी शहरापासून जवळच असलेला चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरला आहे.परळीकरांना जलक्रीडेचा आनंद देणारा चांदापुर लघुतलाव काठोकाठ भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.तसेच या तलावाखालील सिंचन क्षेत्रात या जलसाठ्याचा लाभ होणार आहे.
परळी शहरात लहान मुले व युवकांना पोहण्यासाठी स्विमिंग पूलच नाही. शहरापासून जवळच सात किलोमीटर अंतरावर असलेला चांदापुर चा तलाव आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या तलावालाच स्विमिंग पूल केलेले आहे. सकाळी पाच पासून ते दहा अकरा वाजेपर्यंत या तलावावर सुमारे चारशे ते पाचशे नागरिक आपल्या बच्चे कंपनीला घेऊन या तलावावर गर्दी करतात. यावर्षी धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे . त्यामुळे हा लघुतलाव आता पुर्ण भरुन ओसंडून वाहण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी पोहण्यासाठी जाणार्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा