इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:भारतीय जनता युवा मोर्चा बीड आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण ! धारुरच्या कु.साक्षी मुंडे ने पटकावलं प्रथम पारितोषिक

 भारतीय जनता युवा मोर्चा बीड आयोजीत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण !

धारुरच्या कु.साक्षी मुंडे ने पटकावलं प्रथम पारितोषिक



परळी, प्रतिनिधी...

 लोकनेत्या मा.पंकजाताई मुंडे यांच्या  वाढदिवसानिमित्त विद्यार्थी व युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भारतीय जनता युवा मोर्चा बीड यांनी जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत एकूण 93 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.आज परळी येथे अक्षदा मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.

यात कु.साक्षी मुंडे,(धारूर) हिने प्रथम पारितोषिक पटकावले  5001/- रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. चि.दिलीप शिंदे (परळी) द्वितीय पारितोषिक पटकावले 3001/- रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. तसेच कु.पूनम दुतारमाल (बीड)तृतीय पारितोषिक पटकावले 1501/-रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले तसेच वकृत्व स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय जनता पार्टी चे प्रदेश सचिव राजेश जी देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष सतीशजी मुंडे ,भाजपा जेष्ठ नेते दत्ताप्पा इटके सर,भीमराव जी मुंडे,बाबूजी मुंडे,डॉ.शालिनी ताई कराड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ भाऊ चाटे ,राजेंद्रजी ओझा, महादेव इटके, उमेश जी खाड़े, पवन मुंडे सर,रवि कांदे सर,संतोष सोळके ,राजेश अघाव,,स्पर्धेचे आयोजक ॲड.अरुण पाठक ,योगेश पांडकर,गोविंद चौरे ,सुशील हरनगुले,शाम गिते, नितिन,मुंडे,विजयकुमार खोसे,वैजनाथ रेंकने,विकास हालगे,पवन तोड़कारी,सदाम पठान हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या